अक्षय कुमारसोबत तब्बू शेअर करणार स्क्रीन, 'भूत बंगल्या'चं रहस्य शोधण्यात लावणार जीवाची बाजी!
दिग्गज अभिनेता अक्षय कुमारसोबत आता तब्बू स्क्रीन शेअर करणार आहे. ती भूत बंगला या बहुचर्चित चित्रपटात दिसणार आहे. तशी माहिती तिने दिली आहे.
मुंबई : गेल्या वर्षी हॉरर कॉमेडी असणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच चालले. यात स्त्री-3, भूलभूलैया-3 असा मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. आगामी काळातही अशाच प्रकारचे चित्रपट सिनेरसिकांना पाहायला मिळणार आहेत. यामध्ये भूत बंगला या चित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. असे असतानाच आता या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री तब्बू हीदेखील दिसणार आहे. नुकतेच तब्बूने याबाबतची घोषणा केली आहे.
अक्षय कुमारसोबत तब्बू दिसणार
तब्बूने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर फिल्मच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत क्लॅपबोर्ड दिसतोय. क्लॅपबोर्डवर भूत बंगला असं लिहिलेलं असून यात सिनं नंबर, शॉट नंबर याबाबत सविस्तरपणे लिहिलेलं आहे. सोबतच तिने छानसं कॅप्शनही लिहिलं आहे. एका नव्या कहाणीसह एक नवी सुरूवात होत आहे. अक्षय कुमार, परेश रावल, प्रियदर्शन सर यांच्यासोबत काम करण्यासाठी फार उत्सुक आहे, असं तब्बूने म्हटलंय.
भूत प्रेत, काळी जादू अनू जुनी हवेली
भूत बंगला या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार असणार आहेत. अक्षय कुमार हा प्रमुख नायकाच्या भूमिकेत असेल. तसेच परेश रावल, वमिका गब्बी, जीशू सेनगुप्ता असे बडे कलाकारही या चित्रपटात दिसतील. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी असणार आहे. या चित्रपटात भूत प्रेत, काळी जादू आणि जुनी हवेली याच्या अवतीभोवती फिरणारी कथा दाखवण्यात येणार आहे. अक्षय कुमार या चित्रपटात एका जादुगाराच्या भूमिकेत दिसू शकतात. तब्बूची भूमिका नेमकी काय असेल, हे अद्याप नेमके समजू शकले नाही.
View this post on Instagram
हॉरर कॉमेडी लोकांच्या पसंतीस उतरणार का?
या चित्रपटाला प्रियदर्शन दिग्दर्शित करत आहेत. मुंबई तसेच आसपासच्या ठिकाणावर या चित्रपटाचे शूटिंग चालू आहे. परेश रावल आणि अक्षय कुमार यांनी प्रियदर्शनसोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे यावेळी भूत बंगला या चित्रपटाच्या रुपातील हॉरर कॉमेडी लोकांच्या पसंतीस उतरणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
रणबीर कपूरचा भाऊ आदर जैनचं शाही थाटात लग्न, गोव्याच्या किनारी अडकला लग्नबंधनात, बायको नेमकी कोण?
हार्दिकसोबत काडीमोड होताच नताशाला मिळालं नवं प्रेम? नेमकं कुणाला करतेय डेट