'अभिषेक बच्चन माझा नवरा', दावा करत जान्हवी कपूरने कापली होती हाताची नस, ऐश्वर्यासोबतचं लग्न मोडण्यासाठी घातला होता राडा!
जान्हवी कपूरने अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता. तिने आपल्या हाताची नस कापून घेतली होती.
Abhishek Bachchan-Aishwary Rai Wedding Controversy: अभिषेक बच्चन हा बॉलिवुडचा दमदार आणि मोठा मान असलेला अभिनेता आहे. ऐश्वर्या राय ही त्याची पत्नी आहे. या दोघांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. मात्र हे लग्न काही सहजासहजी पार पडलं नव्हतं. या लग्नात अनेक संकटं आली होती. जान्हवी कपूर नावाच्या महिलेने तर थेट हाताची नस कापून अभिषेक बच्चन माझा नवरा असल्याचं दावा केला होता. विशेष म्हणजे अभिषेकने माझ्याशी आधीच लग्न केलं आहे, असा दावादेखील केला होता. या प्रकरणाची तेव्हा देशभरात चर्चा झाली होती.
हाताची नस कापून घेत लग्न मोडण्याचा प्रयत्न
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे 2007 साली लग्न झाले होते. हे लग्न मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा या घरात पार पडले होते. या लग्नाचे फोटो बाहेर आल्यानंतर तेव्हा अनेकांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र याच लग्नात जान्हवी कपूर नावाच्या एका मॉडेलने चांगलीच आडकाठी घातली होती. तिने अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर येऊन अभिषेक-ऐश्वर्या यांचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता. तिने अमिताभ यांच्या घरापुढे येऊन थेट हाताची नस कापून घेतली होती. ही मुलगी म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जन्हवी कपूर नाही. ती एक मॉडेल होती. या मॉडेलने अभिषेक बच्चन याच्यासोबत दस या चित्रपटात काम केलेले आहे.
'अभिषेक बच्चनने माझ्याशी अगोदरच लग्न केलं आहे'
अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाची एकीकडे धूम चालू होती. तर दुसरीकडे या मॉडेलने अभिषेक माझा नवरा आहे, असा दावा केला होता. जानव्हीने थेट अमिताभ बच्चन यांचा बंगला गाठला होता. अभिषेक बच्चनने माझ्याशी अगोदरच लग्न केलेलं आहे, असा दावा तिने केला होता. एवढ्यावरच न थांबता तिने थेट पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला होता.
....नंतर मात्र जान्हवी कपूर गायब झाली
जान्हवी कपूरच्या या दाव्याला अनेकांनी पब्लिसिटी स्टंट आहे, असं मानलं होतं. अगोदर जान्हवी कपूर शांततेत अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर अभिषेक हा माझा नवरा असल्याचं सांगत होती. नंतर मात्र तिने रागात येऊन थेट हाताची नस कापली होती. नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. माझा नवरा ऐश्वर्या रायने चोरला असा आरोप तिने केला होता. उपचार घेऊन जान्हवी कपूर बाहेर आल्यानंतर मात्र ती गायब झाली. तिने माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
हेही वाचा :
युझवेंद्र-धनश्रीच्या घटस्फोटाची चर्चा, उर्फी मात्र चांगलीच भडकली; म्हणाली प्रत्येक वेळी महिलाच...