एक्स्प्लोर

Shubhangi Atre Emotional Remembering Her Late Husband: आधी घटस्फोट, नंतर काही महिन्यांतच पतीचं निधन; मराठी अभिनेत्री नवऱ्याच्या आठवणीनं व्याकूळ, म्हणाली...

Shubhangi Atre Emotional Remembering Her Late Husband: अभिनेत्री शुभांगी अत्रेनं तिच्या करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. पण, कितीही संकटं आली तरीसुद्धा शुभांगीनं शो मस्ट गो ऑन असं म्हणत, आपलं काम सुरूच ठेवलं.

Shubhangi Atre Emotional Remembering Her Late Husband: छोट्या पडद्यावर अंगूरी भाभीची (Angoori Bhabhi) भूमिका साकारणारी अभिनेत्री  शुभांगी अत्रे (Actress Shubhangi Atre) नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असते. शुभांगीनं तिच्या करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. पण, कितीही संकटं आली तरीसुद्धा शुभांगीनं शो मस्ट गो ऑन असं म्हणत, आपलं काम सुरूच ठेवलं. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर शुभांगीनं सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला आणि ते आव्हान पेललंही. तिनं मोठ्या धाडसानं आपल्या मुलीचा सांभाळ केला. आज शुभांगीची मुलगी 20 वर्षांची आहे. पण, घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच पतीचं निधनानं शुभांगीवर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीसुद्धा शुभांगीनं कलाकार म्हणून आपलं कर्तव्य नेहमीच पार पाडलं. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना शुभांगी अत्रेनं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींवर भाष्य केलंय. अभिनेत्री शुभांगी अत्रेनं नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अनेक गोष्टींवर भाष्य केलंय.  

मराठी अभिनेत्री शुभांगी अत्रे काय म्हणाली?

मराठमोळी अभिनेत्री शुभांगी अत्रे म्हणाली की, "गेली 3-4 वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होती. मी माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल कधीच बोलत नाही. माझं फारसं मित्रमंडळीही नाही. माझ्यासाठी माझं घर आणि काम एवढंच महत्वाचं आहे... पण पतीपासून वेगळी झाले, तो काळ मी कधीच विसरु शकत नाही. तो माझ्या आयुष्यातला खूपच कठीण काळ होता. गेल्या वर्षीच पीयूषचं निधन झालं, तेव्हा मी अक्षरशः कोसळले. पण मला विश्वास आहे की, पीयूषचा आशीर्वाद माझ्यावर आणि आमची लेक आशीवर कायम आहे. मला पीयूषच्या चांगल्या आठवणी जपून ठेवायच्यात. आता मी भोपाळला घरी जाईन, तेव्हा आई-वडिलांसोबत सिनेमा पाहणार आहे. तिथे मी पीयूषसाठीही एक सीट राखून ठेवणार आहे. कारण अभिनेत्री होण्याच्या माझ्या प्रवासात पीयूषनं मला खूप पाठिंबा दिलाय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shubhangi Atre (@shubhangiaofficial)

शुभांगीनं आपल्या पतीच्या आठवणींना उजाळा देताना एक खास संकल्पही व्यक्त केलाय. ती म्हणाली, "पीयूषनं मला अभिनेत्री बनण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिलाय. त्यामुळे माझ्या बाजूला त्याची एक सीट मी नक्कीच राखून ठेवेन, हे मी स्वत:लाच दिलेलं वचन आहे..."

20 वर्षांच्या मुलीशी कसंय शुभांगीचं नातं? 

शुभांगी अत्रे पुढे बोलताना आपल्या वीस वर्षांच्या मुलीसोबत असलेल्या नात्याबाबत सांगितलं. अभिनेत्री म्हणाली की, "आज मला वाटतंय की, तरुण आई होण्याचे अनेक फायदे आहेत... मी किती लवकर आई झाली, याचा मला पूर्वी प्रश्न पडायचा, पण आता मी मातृत्वाचा पूर्ण आनंद घेतेय. काम करताना मला खूप त्रास होतो आणि कालच माझी मुलगी मला म्हणाली की, "आई, तू अजूनही लहान आहेस..." यावेळी जेव्हा ती तिच्या शिक्षणासाठी अमेरिकेला जात होती, त्यावेळी तिला माझी चिंता वाटत होती. स्वतःची काळजी घेण्यासाठी ती मला टिप्स देत होती. खरं सांगू मुली वरदान असतात..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bhojpuri Singer Nisha Upadhyay Slaps Anchor On Stage: 'आपका रेट क्या है', मंचावरच प्रसिद्ध गायिकेला निवेदकाचा जाहीर प्रश्न; प्रेक्षकांसमोरच चप्पलेनं झोडलं VIDEO

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget