सिटी ऑफ ड्रिम्सनंतर प्रिया बापटने पुन्हा एकदा दिला लेस्बियन किसिंग सीन, अंधेरा वेबसिरीज तुफान चर्चेत
Actress Priya Bapat : सिटी ऑफ ड्रिम्सनंतर प्रिया बापटने पुन्हा एकदा दिला लेस्बियन किसिंग सीन, अंधेरा वेबसिरीज तुफान चर्चेत

Actress Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट हिने मराठी सिनेसृष्टीबरोबरच हिंदी सिनेमांमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय. तिने बऱ्याच हिंदी वेबसिरीजमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, हिंदी सिनेमात काम करत असताना तिने काही वादग्रस्त सीन देखील केलेले पाहायला मिळाले. सिटी ऑफ ड्रिम्स या वेबसिरीजमधील तिचा लेस्बियन किसिंग सीन वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. सिरीजपेक्षा तिच्या किसिंग सीनची जोरदार चर्चा झाली होती. दरम्यान, आता तिने अशाच पद्धतीने पुन्हा एकदा लेस्बिनय किसिंग सीन दिलाय. Andhera या वेबसिरीजमध्ये प्रिया बापट पुन्हा एकदा लेस्बियन किसिंग सीन देताना पाहायला मिळाली आहे. ही वेबसिरीज amazon prime वर उपलब्ध असून सध्या चर्चेचा विषय बनलीये.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी बोल्ड सीन्सचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो. यात समलैंगिक नातेसंबंधांवरील दृश्यांनाही स्थान मिळू लागले आहे. काही वर्षांपूर्वी सिटी ऑफ ड्रीम्समध्ये प्रिया बापटने दिलेला किसिंग सीन प्रचंड वादग्रस्त ठरला होता. त्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. आता पुन्हा एकदा तिचा दुसऱ्या एका वेब सीरिजमधील किसिंग सीन व्हायरल झाला आहे. अंधेरा या वेब सीरिजमध्ये हा प्रसंग दाखवण्यात आला असून, ही कथा हॉरर, थ्रिलर, अॅक्शन यांच्या मिश्रणावर आधारित आहे. या वेळी प्रेक्षकांना प्रिया पोलिस अधिकार्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. याच सीरिजमधील सुरवीन चावला आणि प्रियाच्या किसिंग सीनची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
दरम्यान, प्रिया बापट याबाबत बोलताना म्हणाली, “मी पहिल्यांदाच हॉरर जॉनरमध्ये काम करतेय आणि हा अनुभव खूप वेगळा ठरला. संपूर्ण सीरिजचे शूटिंग रात्री झाले, तरी कथा इतकी रंगतदार होती की, शूटिंगदरम्यान थकवा जाणवला नाही. कथा वेगवेगळ्या स्तरांवर उलगडत जाते, त्यामुळे ही भूमिका अभिनयासाठी आव्हानात्मक ठरली. यात अॅक्शन सिक्वेन्स आहेत, भीतीदायक प्रसंग आहेत आणि कलाकार म्हणून हे साकारताना खूप मजा आली. आतापर्यंत मी राजकारणी, वकील अशा विविध भूमिका केल्या आहेत; मात्र या सीरिजमध्ये पूर्णपणे नवी भूमिका करत आहे. मराठीत जसं मला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, तसंच प्रेम हिंदी प्रोजेक्ट्समध्येही मिळत असल्याचा मला आनंद आहे. वर्दीतील माझ्या या भूमिकेवरही प्रेक्षक तितकंच प्रेम करतील, याची मला खात्री आहे.”























