जंगलाचा राजा कोण होणार? हार्दिक जोशीच्या 'अरण्य' सिनेमाचा टीझर रिलीज, नव्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला
Hardeek Joshi Aarnya movie teaser release : जंगलाचा राजा कोण होणार ? हार्दिक जोशीच्या 'अरण्य' सिनेमाचा टीझर रिलीज, नव्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला

Hardeek Joshi Aarnya movie teaser release : अभिनेता हार्दिक जोशीच्या 'अरण्य' सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमात हार्दिक जोशी वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतोय. हा सिनेमा जंगलात शूट झाला असून त्याची स्टोरी सुद्धा त्याच पद्धतीची असल्याचं टीझरमधून दिसत आहे. अरण्य या सिनेमाचं दिग्दर्शन Amol Digamber Karambe यांनी केलंय, तर निर्मिती Sharad Patil, Anjali Patil यांनी केली आहे. दरम्यान, सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिलाय.
View this post on Instagram
तुझ्यात जीव रंगला ही हार्दिक जोशीची टीव्ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत त्याने एका पैलवानाची भूमिका साकारली होती. मालिकेमुळे त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली की सगळे लोक त्याला 'राणा दा' म्हणून ओळखू लागले. मालिकांमधून लोकप्रिय झाल्यानंतर आता त्याने मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले आहे. मालिकेत निरागस आणि साधेपणाने दिसणारा राणा दा, नव्या चित्रपटात मात्र एकदम डेंजर लूकमध्ये पाहायला मिळतोय. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून, त्याची खासियत म्हणजे संपूर्ण चित्रपट गडचिरोलीच्या जंगलात चित्रित करण्यात आला आहे.
अरण्य या सिनेमाचा 1 मिनिटं 13 सेकंदाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. टिझरच्या सुरुवातीलाच हार्दिक स्वतःला ‘जंगलचा वाघ’ अशी उपाधी देतो. तो ठाम आवाजात म्हणतो – “बंदूक हीच माझी ओळख आहे.” यातून त्याचा नक्षलवादी अवतार स्पष्ट दिसून येतो. परंतु, आपल्या आयुष्यात मुलगी आल्यानंतर सर्व काही बदलल्याचे तो सांगताना दिसतो. पुढे टिझरमध्ये त्याच्या मुलीच्या हातातही बंदूक दाखवली आहे. त्यामुळे आता ती वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत त्याच मार्गावर चालणार का? की या कारणाने संपूर्ण कुटुंब जंगल मागे सोडून बाहेर पडणार? असा प्रश्न प्रेक्षकांसमोर निर्माण होतो. हा चित्रपट 19 सप्टेंबरला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
अरण्य या सिनेमात कोणा कोणाच्या भूमिका?
या चित्रपटात हार्दिक जोशीसोबत वीणा जगताप, हृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा आणि चेतन चावडा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी केली आहे. गडचिरोलीच्या दाट जंगलाच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झालेल्या या सिनेमात प्रेक्षकांना खऱ्या विदर्भी भाषाशैलीचा आणि वातावरणाचा अनुभव मिळणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अक्षय कुमार अन् सैफ अली खान तब्बल 18 वर्षांनंतर सिनेमात एकत्र झळकणार, इन्स्टाग्रामवर दिली मोठी अपडेट























