एक्स्प्लोर

ए वेडे...प्रिया , पियू , परी , प्री ; अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहेरे भावूक; इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

Actress Prarthana Behere on Priya Marathe death : ए वेडे...प्रिया , पियू , परी , प्री ; अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहेरे भावूक; इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

Actress Prarthana Behere on Priya Marathe death : मराठी मनोरंजनसृष्टीतून रविवारी (दि.1) धक्कादायक बातमी समोर आली. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन झालंय. गेल्या काही महिन्यांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. मात्र अखेर या आजारावर मात करण्यात तिला अपयश आलं आणि तिनं जगाचा निरोप घेतला. प्रिया मराठे ही छोट्या पडद्यावरील एक नावाजलेली अभिनेत्री होती. तिनं ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. आपल्या नैसर्गिक अभिनयामुळे ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. अचानक झालेल्या या निधनामुळे मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या जाण्यानं प्रेक्षकांना, सहकाऱ्यांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, प्रिया मराठीचं निधन झाल्यानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलंय. 

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची पोस्ट जशीच्या तशी 

ए वेडे प्रिया , पियू , परी , प्री ,ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती, ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याच्याची मैत्रीण होती. माझी वेडे ... ❤️ आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं. कितीतरी वेळा आम्ही तासन्‌तास बोलत बसायचो…मॅगी, भुर्जी, कॉफी… हे सगळं आमचं छोटंसं जग होतं. खूप साऱ्या गप्पा, काहीसं वेडं हसणं, रात्री उशिरा पर्यंत जागणं – त्या क्षणांना काही तोड नाही.

ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती – आणि खरी सख्खी मैत्रीण. तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं. तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं, हसावं, रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं.अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा सर्व काही नवीन, अनोळखी आणि वाटायचं, तेव्हा तिचं हसतं मुख, तिचं प्रेमळ बळ माझ्यासोबत होतं. तिच्यासोबत मी पहिला सीन केला, पहिल्यांदा camera शेअर केला ,

ती इतकी हसमुख , प्रामाणिक, भावनाशील आणि जिव्हाळ्याने भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभरही घालवला, तरी तो कायमचा लक्षात राहिला. कॅन्सरशी लढा देत असताना, एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली. तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती. मी, ती आणि शाल्मली — आम्ही तिघींनी एकत्र इतका सुंदर वेळ घालवला की तो क्षण कायमचा मनात कोरला गेला आहे. ती खूप आनंदी होती…

तेव्हा तिने मला एका शांत स्वरात म्हटलं,“तुझं घर, तुझं वातावरण, तुझे हे कुत्रे… हे सगळं मला बरे करतंय. मला इथे येऊन बरं वाटतंय… जणू काही हे ठिकाणच मला heal करतंय.” कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण तिचं मन, तिचा आत्मा, तिचं खंबीरपणं – ते कोणतंही आजार हरवू शकला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं. ती गेली, पण तिच्या आठवणी, तिचं हास्य, तिचं अभिनयातलं तेज — सगळं अजूनही माझ्यासोबत आहे. माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबतच गेला, आणि तो भाग मी जपून ठेवणार आहे — कायमचा.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prarthana Behere Jawkar 💜 (@prarthana.behere)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आराध्या बच्चन झाली ऐश्वर्यापेक्षा उंच, गणपतीच्या दर्शनाला आलेल्या मायलेकींची तुफान चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
Nagarparishad Election Result: उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
Nagarparishad Election Result: निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
Sanjay Raut on Eknath Shinde: 'मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर'; एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत संजय राऊत कडाडले
'मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर'; एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत संजय राऊत कडाडले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar On Voting : सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिशी - रोहित पवार
Devendra Fadnavis PC आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी, मतमोजणी पुढे ढकलल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
Sandeep Kshirsagar On Voting : निवडणूक हातातून गेल्यानं पैसे वाटपाचा प्रकार - संदीप क्षीरसागर
Vaibhav Naik On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या, वैभव नाईकांचा आरोप
Hingoli Local Body Elections Voting : Santosh Bangar यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
Nagarparishad Election Result: उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
Nagarparishad Election Result: निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
Sanjay Raut on Eknath Shinde: 'मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर'; एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत संजय राऊत कडाडले
'मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर'; एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत संजय राऊत कडाडले
Fake Voters Nagarparishad Election: मोठी बातमी: नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोनजण ताब्यात, गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती
मोठी बातमी: नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोनजण ताब्यात, गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती
Dhananjay Munde & Ratnakar Gutte: धनुभाऊ तुमचा इंदौरमध्ये तुमचा मर्डर झाला असता, भय्यू महाराजांनी तुम्हाला वाचवलं; रत्नाकर गुट्टेंचा धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा
धनुभाऊ तुमचा इंदौरमध्ये तुमचा मर्डर झाला असता, भय्यू महाराजांनी तुम्हाला वाचवलं; रत्नाकर गुट्टेंचा धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा
Nagarparishad Election Result: मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!
मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!
Maharashtra Election: मोठी बातमी: राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला? आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला? आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
Embed widget