आराध्या बच्चन झाली ऐश्वर्यापेक्षा उंच, गणपतीच्या दर्शनाला आलेल्या मायलेकींची तुफान चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क
आई-मुलीच्या जोडीने हात जोडून कॅमेऱ्यासमोर पोज दिली. चाहत्यांना हात हलवून प्रतिसाद देतानाही ऐश्वर्या दिसली. पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते आराध्याने!

Aishwarya Rai & Aradhya Bacchan: बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच प्रत्येक सण आनंदात साजरा करताना दिसते. रविवारी तिने मुलगी आराध्यासह मुंबईतील जीएसबी गणपतीच्या दर्शनाला हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. आराध्या यलो रंगाच्या सूटमध्ये दिसली. तिने केस मोकळे सोडले होते आणि मेकअप केला नव्हता. साधेपणातही ती खूपच सुंदर व क्यूट दिसली. ऐश्वर्याने मात्र पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता. तिने हलका मेकअप, छोटासा बिंदी आणि मिडल पार्टेड हेअरस्टाईल करून आपला लूक पूर्ण केला.
आई-मुलीच्या जोडीने हात जोडून कॅमेऱ्यासमोर पोज दिली. चाहत्यांना हात हलवून प्रतिसाद देतानाही ऐश्वर्या दिसली. पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते आराध्याने! कारण तिची उंची आता ऐश्वर्यापेक्षाही जास्त दिसत आहे. हे पाहून चाहते थक्क झाले असून सोशल मीडियावर तिच्या ग्रोथबद्दल चर्चा रंगली आहे. ऐश्वर्या दरवर्षी जीएसबी गणपतीच्या दर्शनाला जाते. गेल्या वेळी तिने आई वृंदा राय आणि मुलगी आराध्यासोबत दर्शन घेतले होते.
View this post on Instagram
अभिषेक बच्चनसोबतचं लग्न
ऐश्वर्याच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचं झालं, तर तिने अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं आहे. त्यांचा विवाह 2007 मध्ये थाटामाटात पार पडला. 2011 मध्ये त्यांनी मुलगी आराध्याचं स्वागत केलं. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेकला एअरपोर्टवर एकत्र पोज देताना पाहिलं गेलं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या चित्रपटात दिसल्या होत्या ऐश्वर्या
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर ऐश्वर्याचा शेवटचा चित्रपट मणी रत्नम दिग्दर्शित पोन्नियिन सेल्वन 2 होता. या चित्रपटात कार्थी, तृषा कृष्णन, जयराम, प्रभू, शोभिता धुलिपाला, विक्रम प्रभू, प्रकाश राज यांसारखे कलाकार झळकले होते. या चित्रपटाने 344.63 कोटींचं वर्ल्डवाइड कलेक्शन केलं होतं. त्यानंतर ऐश्वर्याने कोणत्याही नवीन प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.
























