अभिनेत्री पूनम पांडेचा मराठमोळा लूक, बाप्पाच्या दर्शनासाठी आल्यानंतर मराठीत संवाद साधला; व्हिडीओ व्हायरल
Actress Poonam Pandey speak Marathi Language : अभिनेत्री पूनम पांडे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मराठमोळ्या लूकमध्ये आलेली पाहायला मिळाली.

Actress Poonam Pandey speak Marathi Language : आपल्या बोल्ड कपड्यांमुळे नेहमी वादात सापडणारी बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे यावेळी पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसली. (Actress Poonam Pandey speak Marathi Language) गणेशोत्सवानिमित्त बाप्पाच्या दर्शनासाठी ती मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत आलेली पाहायला मिळाली. तिचा हा साधा, पारंपरिक अवतार पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले. (Actress Poonam Pandey speak Marathi Language) पूनमने साडी नेसून, पारंपरिक दागिने परिधान करून बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना तिने मराठीत संवाद साधला. “बाप्पाने बोलवलंय, खूप मोठी गोष्ट आहे. सर्वजण हळूहळू या. गणपत्ती बाप्पा मोरया..!,” असं पूनम पांडे यावेळी बोलताना म्हणाली. (Actress Poonam Pandey speak Marathi Language)
साधारणपणे बोल्ड इमेजमुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहणारी पूनम, यावेळी मात्र तिच्या मराठमोळ्या लूकमुळे चर्चेत आली आहे. तिचा हा व्हिडीओ काही तासांतच व्हायरल झाला असून, नेटिझन्सकडून मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींनी तिच्या साधेपणाचे कौतुक केले, तर काहींनी याला “इमेज बदलण्याचा प्रयत्न” असे म्हटले. मात्र, पूनम पांडेने पारंपरिक अवतारात बाप्पाचे दर्शन घेतल्याने तिचा हा लूक चर्चेचा विषय ठरत आहे. (Actress Poonam Pandey speak Marathi Language)
View this post on Instagram
गणेशोत्सवाच्या काळात भक्त बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. अनेक कलाकारांनी गणेशोत्सवादरम्यान गणपती बाप्पाचे दर्शन घेतलेले पाहायला मिळाले. दरम्यान, मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीही सेलिब्रिटींची वारी सुरूच आहे. आज, बुधवारच्या दिवशी अभिनेत्री ईशा देओल लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली आणि बाप्पाचे आशीर्वाद घेतले. तिच्यासोबतच तारक मेहता मालिकेतून प्रसिद्ध झालेली दिशा वकानी आणि अभिनेत्री पूनम पांडेही मराठमोळ्या लूकमध्ये सजून बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हजर झाल्या. (Actress Poonam Pandey speak Marathi Language)
अभिनेत्री मधुसोबत दर्शनासाठी पोहोचली ईशा
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची कन्या, अभिनेत्री ईशा देओल बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली. ईशा ही साऊथ अभिनेत्री मधुच्या सोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आली होती. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओत दोघीही एकत्र दर्शनाला जाताना दिसतात. दोन्ही अभिनेत्री चालत मंदिरापर्यंत पोहोचल्या. मधु साडीमध्ये दिसली, तर ईशा हिरव्या रंगाच्या सूटमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. (Actress Poonam Pandey speak Marathi Language)
बाप्पाच्या दरबारात दयाबेनची हजेरी
टीव्ही मालिकेत तारक मेहता का उल्टा चश्मा या शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री दिशा वकानीही आज, बुधवारच्या दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली. तिने बाप्पाचे आशीर्वाद घेतले. दयाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Actress Poonam Pandey speak Marathi Language)
इतर महत्त्वाच्या बातम्या
राजेश खन्नाची हिरोईन, 28 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन, सावत्र बापाने केली होती हत्या
एक-दोन नव्हे तर पवन कल्याण यांनी 3 लग्न केली; पहिली पत्नी 16 वर्षांपासून गायब? आता कुठे आहे?























