राजेश खन्नाची हिरोईन, 28 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन, सावत्र बापाने केली होती हत्या
bollywood : राजेश खन्नाची हिरोईन, 28 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन, सावत्र बापाने केली होती हत्या

bollywood : बॉलिवूडच्या झगमगाटाच्या दुनियेत अनेकदा अभिनेत्यांचे वैयक्तिक आयुष्य तेवढ्याच संघर्षांनी भरलेले असते, जितक्या पडद्यावर त्यांच्या कहाण्या दाखवल्या जातात. अशीच एक कहाणी आहे त्या अभिनेत्रीची, जिने कधीकाळी स्वतःपेक्षा तब्बल 28 वर्षांनी मोठ्या सुपरस्टार राजेश खन्नासोबत चित्रपटात स्क्रीन शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. वयाने लहान असूनही तिला अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन करावे लागले. मात्र, या ग्लॅमरच्या दुनियेच्या आड त्या अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य अतिशय वेदनादायी होतं. ती एक अपयशी अभिनेत्री होती, जिला जगत असताना फारशी ओळख मिळाली नाही; पण मृत्यूनंतर ती सर्वत्र चर्चेत आली.
त्या काळात राजेश खन्नासोबत काम करणे ही प्रत्येक अभिनेत्रीची स्वप्नं होती. काहींना ही संधी मिळाली आणि जोड्या हिट ठरल्या. परंतु, जसंजसं काकांचं करिअर ढासळू लागलं तसतसे फिल्ममेकरच नव्हे तर अभिनेत्रीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागल्या. त्यांना बी-ग्रेड चित्रपटांत काम करावं लागलं. 2008 साली सुपरस्टार राजेश खन्ना करिअरच्या उतरंडीत होते आणि ‘वफा: ए डेडली लव्ह स्टोरी’ सारख्या बी-ग्रेड चित्रपटांत काम करत होते.
या चित्रपटात एका नव्या अभिनेत्रीला – लैला खानला – लीड हिरोइन म्हणून घेतलं गेलं. राजेश खन्ना आणि लैलामध्ये तब्बल 28 वर्षांचा फरक होता आणि चित्रपटात भरपूर इंटिमेट सीन दाखवले गेले, ज्यामुळे हा चित्रपट चर्चेत आला. मात्र, चित्रपट फ्लॉप ठरला. पण नंतर लैला खानचं नाव अशा एका भयानक कहाणीशी जोडले गेले, ज्याने संपूर्ण देश हादरला.
2011 साली लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच सदस्य अचानक रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले. चौकशीत उघड झाले की, त्यांची निर्दयपणे हत्या तिच्याच सावत्र वडिलांनी केली होती. लैला खानची आई सेलीना हिचे तिसरे लग्न परवेज टाकसोबत झाले होते. कुटुंब मुंबईतील ओशिवारा येथे राहत होते. क्राईम ब्रांचचे अधिकारी अंबादास पोटे (ज्यांनी हा खटला तपासला) यांनी हुसेन जैदी यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, परवेज टाक धार्मिक प्रवृत्तीचा माणूस होता आणि त्याला लैला हिने चित्रपटसृष्टीत काम करणे अजिबात आवडत नव्हते.
याशिवाय मालमत्तेवरूनही कुटुंबात वाद होता. टाक यांना हवे होते की लैला दुबईला जाऊन काम करावे; पण तिने नकार दिल्यावर त्याने संपूर्ण कुटुंब संपवण्याची कटकारस्थान रचलं. टाक याने आधी आपल्या एका साथीदाराला कुटुंबाच्या इगतपुरीतील फार्महाऊसवर चौकीदार म्हणून नेमले. नंतर कुटुंबाला फार्महाऊसवर फिरायला जाण्याचे आमिष दिले. कुटुंब तिथे गेले, रात्री बार्बेक्यू आणि डान्स झाला. पण त्याच रात्री टाक आणि त्याच्या साथीदाराने लोखंडी रॉड व सुरीने एकामागून एक सर्वांवर हल्ला केला.
लैलाचा भाऊ इमरान जखमी झालेला असूनही सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत राहिला, पण टाकने खात्री केली की कोणीही जिवंत राहू नये. हल्ल्यानंतर मृतदेह फार्महाऊसवरील स्विमिंग पूलसाठी खणलेल्या खड्ड्यात गाडले. आधी तीन मृतदेह टाकून त्यावर गाद्या व माती टाकली गेली, मग उरलेले तीन मृतदेह गाडून त्यावर माती घातली.
कुटुंब परत न आल्यावर सेलिनाचे पहिले पती नादिर शाह यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तपासात पोलिसांना टाकचे आधार कार्ड त्यांच्या घरातून मिळाले. त्यानंतर मुंबई व जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने परवेज टाकला काश्मीरमधून अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पावसामुळे माती खचली होती आणि सहा तासांच्या खुदाईनंतर कंकाल सापडले, जे डॉक्टरांनी मानवी अवशेष असल्याचे पुष्टी केले.
लांब न्यायप्रक्रियेनंतर 2024 साली मुंबई सत्र न्यायालयाने परवेज टाकला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. कोर्टाने म्हटले होते, "हा पूर्णपणे बर्बर गुन्हा होता, ज्याने समाजाची सामूहिक अंतरात्मा हादरवली. हे ‘रेअर ऑफ द रेयरेस्ट’ प्रकरण आहे." मात्र, टाकचा साथीदार अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही.
लैला खानने 2002 साली कन्नड चित्रपट ‘मेकअप’ मधून करिअरची सुरुवात केली होती. अनेक मीडियातील अहवालांनुसार, लैलाने कथितरित्या मुनीर खानशी लग्न केले होते. हा तोच माणूस होता, जो बंदी घातलेल्या बांग्लादेशी दहशतवादी संघटना हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी चा सदस्य होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या























