एक्स्प्लोर

Actress Nandini Kashyap Arrested In Hit And Run Case: सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडून हिट अँड रन; 21 वर्षीय विद्यार्थ्याला चिरडून पळून गेली; पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Actress Nandini Kashyap Arrested In Hit And Run Case: घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी एनडीटीव्हीला सांगितलं की, विद्यार्थ्याला चिरडल्यानंतर नंदिनी त्याला मदत करण्यासाठी थांबली नाही आणि गाडी घेऊन पळून गेली.

Actress Nandini Kashyap Arrested In Hit And Run Case: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रुद्र' या गाजलेल्या आसामी चित्रपटात (Aasami Movie) सुरभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंदिनी कश्यप (Actress Nandini Kashyap) हिला पोलिसांनी 'हिट अँड रन' (Hit And Run Case) प्रकरणात अटक केली आहे. गुवाहाटी पोलिसांनी (Guwahati Police) सांगितलं की, नंदिनी कश्यपच्या (Nandini Kashyap) गाडीनं एका 21 वर्षीय मुलाला चिरडलं होतं. 29 जुलै रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नंदिनीला अटक करण्यात आली आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेला तरुण नलबारी पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी होती आणि गुवाहाटी महानगरपालिकेत अर्धवेळ काम करत होती. 

मीडिया रिपोर्टनुसार, 25 जुलै रोजी गुवाहाटीच्या दखिंगगाव भागात ही घटना घडली. मृत तरुणाचं नाव समीउल हक असं आहे, तो नलबारी पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता. तो एका गरीब कुटुंबातील होता आणि गुवाहाटी महानगरपालिकेत नोकरी करून त्याच्या अभ्यासाचा खर्च भागवत होता, अशी माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी पहाटे 3 वाजता तो घरी परतत होता. त्यावेळी एका भरधाव वेगानं येणाऱ्या स्कॉर्पिओ कारनं त्याला चिरडलं. सुप्रसिद्ध आसामी अभिनेत्री नंदिनी कश्यप ती स्कॉर्पिओ गाडी चालवत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी एनडीटीव्हीला सांगितलं की, विद्यार्थ्याला चिरडल्यानंतर नंदिनी त्याला मदत करण्यासाठी थांबली नाही आणि गाडी घेऊन पळून गेली. समीउल हकसोबत त्यावेळी त्याचे मित्रही होते, त्यापैकी काही मित्र अभिनेत्रीचा पाठलाग करत काहिलीपारा येथील अपार्टमेंटमध्ये पोहोचले, जिथे नंदिनी कथितपणे तिची गाडी लपवण्याचा प्रयत्न करत होती. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, ते अभिनेत्रीशी वाद घालतानाही दिसत आहेत.

गंभीर दुखापतीमुळे तरुणाचा मृत्यू 

अभिनेत्रीनं गाडीनं चिरडल्यानंतर तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली, त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. त्याच्या दोन्ही पायांना अनेक फ्रॅक्च झालेले. मांडी आणि हाताची हाडं तुटलेली. त्याला सर्वात आधी गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आणि नंतर एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. मंगळवारी संध्याकाळी उशिरा त्याचा आयसीयूमध्ये मृत्यू झाला. कुटुंबियांनी सांगितलं की, नंदिनीनं सुरुवातीला मृत तरुणाच्या कुटुंबीयांना त्याच्या उपचाराचा खर्च उचलण्याचं आश्वासन दिलं. पण, कधीही मदत केली नाही. 

गुवाहाटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही अभिनेत्री नंदिनी कश्यपला हिट-अँड-रन प्रकरणात अटक केली आहे. यापूर्वी आम्ही फक्त तिची चौकशी केली होती, कारण सुरुवातीला हा खटला जामीनपात्र कलमांखाली दाखल करण्यात आला होता. दरम्यान, काल म्हणजेच मंगळवार, 29 जुलै रोजी संध्याकाळी पीडितेचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत, आम्ही या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील जोडला, जो जामीनपात्र नाही.

नंदिनी कश्यप आहे तरी कोण? 

नंदिनी कश्यप कोण आहे? नंदिनी कश्यप ही आसामी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री. दिग्दर्शक रूपक गोगोई यांच्या अलिकडच्या हिट चित्रपट 'रुद्र'मध्ये सुरभीची मुख्य भूमिका साकारण्यासाठी ती ओळखली जाते. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे, तिचे इंस्टाग्रामवर 52.5 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचं खरं नाव निकिता आहे आणि ती गुवाहाटीची आहे. तिनं तिचं शालेय शिक्षण अमिनगाव येथील फॅकल्टी हायर सेकेंडरी स्कूलमधून पूर्ण केलं आणि त्यानंतर 2021 मध्ये मेघालयातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून बॅचलर पदवी प्राप्त केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Actor Life Story: वयाच्या सत्तरीत जगतोय लग्झरी लाईफ, 131 कोटींच्या बंगल्यात राहतो 'हा' सुपरस्टार; 21 वेळा जिंकलाय फिल्मफेयर अवॉर्ड

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Embed widget