Bollywood Actor Life Story: वयाच्या सत्तरीत जगतोय लग्झरी लाईफ, 131 कोटींच्या बंगल्यात राहतो 'हा' सुपरस्टार; 21 वेळा जिंकलाय फिल्मफेयर अवॉर्ड
Bollywood Actor Life Story: अभिनेत्यानं 21 वेळा फिल्मफेअर पुरस्कार जिंकलेत, तर या अभिनेत्याच्या नेटवर्थबबात बोलायचं झालं तर, तब्बल 600 कोटी आहे.

Bollywood Actor Life Story: 131 कोटींच्या बंगल्यात राहणारा हा सुपरस्टार (Bollywood Superstar) मूळचा दक्षिणेचा, पण तरीसुद्धा यानं साऊथ इंडस्ट्रीपासून (South Superstar) थेट बॉलिवूडपर्यंतची (Bollywood) मजल मारली आणि रसिक-प्रेक्षकांवर आपली छाप सोडली. आज या सुपरस्टारचं नेटवर्थ (Net Worth) तब्बल 600 कोटींहून अधिक आहे. संपत्तीच्या बाबतीत हा अभिनेता अगदी सहज बॉलिवूडच्या बड्या सुपरस्टार (Bollywood Actor) अभिनेत्यांना मागे टाकतो. या अभिनेत्यानं आजवर अनेक कल्ट सिनेमे दिलेत. इंडस्ट्रीत तर याचं नाव उच्चारताच, सर्वांच्या माना आदरानं झुकतात... या अभिनेत्याला तुम्ही ओळखता का?
दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूड गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध सुपरस्टारचं नाव आहे, कमल हसन. वयाच्या 70व्या वर्षीही कमल हसन यांचा उत्साह, ऊर्जा एखाद्या तरुण अभिनेत्याला लाज आणणारी आहे. ते पडद्यावर जेवढ्या रॉयल अंदाजात वावरतात, तेवढेच ते खऱ्या आयुष्यातही रॉयल आयुष्य जगतात.
हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली सिनेमांचा सुपरस्टार
कमल हासन यांनी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. त्यांनी 1960 मध्ये बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि 1974 मध्ये 'कन्याकुमारी' चित्रपटातून मुख्य भूमिकेत पदार्पण केलं. कमल हासन यांना 21 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत, त्यापैकी 19 वेळा दाक्षिणात्य सिनेमांसाठी आणि 2 वेळा हिंदी चित्रपटांसाठी मिळाले आहेत. नंतर त्यांनी नव्या कलाकारांना संधी देण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कारांमधून आपलं नाव मागे घेतलं.
1994 मध्ये एका चित्रपटासाठी 1 कोटी रुपये फी आकारणारे कमल हासन हे पहिले सुपरस्टार होते. आज त्यांची एकूण संपत्ती सुमारे 600 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. ते चेन्नईमध्ये 131 कोटी रुपयांच्या आलिशान बंगल्यात राहतात, जिथे अनेक आलिशान सुविधा आहेत. याशिवाय, त्यांचा लंडनमध्ये एक आलिशान बंगला देखील आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, कमल हासन ब्रँड एंडोर्समेंट आणि त्यांच्या निर्मिती कंपनीतून देखील कमाई करतात. त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या देखील आहेत.
दरम्यान, सुपरस्टार अभिनेते कमल हसन आपल्या एका चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपये आणि 'बिग बॉस' तमिळ होस्ट करण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतो. कमल हासनच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेनं त्याला भारतीय चित्रपटसृष्टीचा एक दिग्गज बनवलं आहे. कमल हसन सर्वात शेवटी 'ठग्स लाईफ' या चित्रपटात दिसले होते. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :



















