अभिनेत्री मनवा नाईकसोबत गैरवर्तन करणाऱ्या कॅब चालकाला बेड्या; सोशल मीडियावरील पोस्टची मुंबई पोलिसांकडून दखल
Manava Naik : अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मनवा नाईक (Manva Naik) सोबत गैरवर्तन करणाऱ्या 24 वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक केली आहे. त्याचं नाव मोहम्मद मुराद आझम अली असून तो अँटॉपहिल येथील रहिवासी आहे.
Manva Naik News: चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मनवा नाईक (Manva Naik) सोबत गैरवर्तन करणाऱ्या कॅब चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. बीकेसी पोलीस ठाण्यात (BKC Police Station) आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 24 वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक केली असून त्याचे नाव मोहम्मद मुराद आझम अली असून तो अँटॉपहिल येथील रहिवासी आहे.
आरोपी कॅब चालकाची गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. अभिनेत्री मनवा नाईकचा आरोप आहे की, जेव्हा ती टॅक्सीने घरी जात होती, तेव्हा कॅब चालकाने तिच्याशी गैरवर्तन केले आणि धमकी दिली होती. मनवा नाईकने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. शनिवारी संध्याकाळी घटना घडली होती. ही गोष्ट मनवा नाईकनं सोशल मीडियावर पोस्टद्वारे शेअर केली होती
अभिनेत्री मनवा नाईकच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना मुंबईचे सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी कॅब चालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकरणात पोलीसानी त्वरीत कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी 24 वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक केली असून त्याचे नाव मोहम्मद मुराद आझम अली असून तो अँटॉपहिल येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि 506 आणि वाहन चालवताना फोनवर बोलणे आणि सिग्नल जंप केल्याबद्दल मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला आज अटक करण्यात आली असून त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नेमकं काय झालं होतं...
मनवाने तिच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने तिच्याबरोबर घडलेल्या धक्कादायक प्रसंगावर भाष्य केलं आहे. पोस्ट शेअर करत तिने एका गाडीचा नंबर आणि त्या वाहन चालकाचा फोटोदेखील शेअर केला होता. यानंतर मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मनवाच्या पोस्टवर कमेंट केली होती. "मनवा जी... आम्ही या घटनेची दखल घेतली आहे. Dcp झोन 8 यावर काम करत आहे. तसेच चालकावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात येईल". यावर भाष्य करत मनवा म्हणाली,"विश्वास नांगरे पाटील नेहमीच माझ्या मदतीला धावून आले आहेत. मी काल ट्वीट केल्यानंतर लगेचच मला मुंबई पोलिसांचा फोन आला. त्यांनी माझी चौकशी केली. लगेचच उबर चालकावर कारवाईदेखील झाली. आयुष्यात अशी एखादी घटना घडते. अशावेळी त्या गोष्टीचा सामना करणं गरजेचं आहे".
I took uber at 8.15pm. the uber driver started talking on phone. At BKC signal he jumped the signal.He started arguing. I intervened. He got angry. Said..' Tu bharegi kyaa 500 rupe'? The uber driver started threatening me..@mybmc @CMOMaharashtra @PMOIndia @MumbaiPolice
— Manava Arun Naik (@Manavanaik) October 15, 2022