एक्स्प्लोर

Chinmayee Salvi :  ‘वागले की दुनिया’ फेम चिन्मयी साळवी लवकरच मोठ्या पडदयावर झळकणार! ‘येरेयेरे पावसा’मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका!

Chinmayee Salvi : आगामी ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटामध्ये चिन्मयीचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 17 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chinmayee Salvi : ‘तू माझा सांगाती’, ‘छोटी मालकीन’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ अशा मराठी मालिकांमधून आणि आता ‘वागले की दुनिया’ या हिंदी मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री चिन्मयी साळवी (Chinmayee Salvi) आता मराठी रुपेरी पडदयावर पदार्पण करणार आहे. आगामी ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटामध्ये तिचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 17 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान यांची असून, दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे.

‘येरे येरे पावसा’ या चित्रपटात चिन्मयी ‘अंजली’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. चित्रपटातील माझ्या भूमिकेला प्रेमाची वेगळी किनार आहे, जी प्रत्येकाला स्पर्शून जाणारी असेल, असं ती सांगते. कॉलेजमध्ये एकांकिका करत असताना चित्रपटातील या भूमिकेसाठी मला विचारणा झाली. प्रत्येकाला चित्रपटाच्या माध्यमातून मोठया पडदयावर काम करायची इच्छा असते. ‘येरे येरे पावसा’च्या निमित्ताने माझं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करतानाच, काही तरी सांगू पाहणारा हा चित्रपट प्रत्येकाने नक्की पहायला हवा, असं ती सांगते.

याआधी झळकली अनेक कार्यक्रमांमध्ये!

नृत्यनिपुण आणि अभिनयाची आवड असणाऱ्या चिन्मयीने दूरदर्शन वाहिनीवरील ‘दम दमा दम’, ई टीव्ही मराठी वाहिनीवरील ‘फूल टू धमाल’, कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ यासारख्या स्पर्धांमध्ये बाजी मारत आपला वेगळा ठसा उमटवला होता.

‘येरे येरे पावसा’ या चित्रपटात चिन्मयी सोबत छाया कदम, मिलिंद शिंदे, संदेश जाधव,  विनायक पोतदार, आर्या आढाव, प्रदीप नवले, प्राजक्ता वाड्ये, वैभव जेऊघाले पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ, प्रज्ञा गोपाले यांच्या भूमिका आहेत.

‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड झाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.

संबंधित बातम्या

Ye Re Ye Re Pavasa : छोट्यांची मोठ्ठी गोष्ट सांगणारा 'येरे येरे पावसा'; 17 जूनला होणार प्रदर्शित

Ye Re Ye Re Pavasa : पुरस्कार पटकावून परदेशातही नाव गाजवणारा ‘येरे येरे पावसा’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Kesarkar : मोती तलावाकडे 4 दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ; सावंतवाडीत दीपक केसरकरांविरोधातील बॅनरची चर्चा, आता बदल हवो तर आमदार नवो…!
मोती तलावाकडे 4 दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ; सावंतवाडीत दीपक केसरकरांविरोधातील बॅनरची चर्चा, आता बदल हवो तर आमदार नवो…!
''एकनाथ शिंदेंना पुढं करुन कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटलांचा बळी घेतलाय''
''एकनाथ शिंदेंना पुढं करुन कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटलांचा बळी घेतलाय''
Exclusive MLA Babandada Shinde : तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
Mahatma Gandhi Letter To Adolf Hitler : महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील मोवाडमध्ये कुटुंबाने सामूहिकरित्या संपवलं जीवनGovinda Gun Fire : अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणी पोलीस गोविंदाच्या जबाबावर समाधानी नाहीत:सूत्रCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaSahyadri Guest House : आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Kesarkar : मोती तलावाकडे 4 दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ; सावंतवाडीत दीपक केसरकरांविरोधातील बॅनरची चर्चा, आता बदल हवो तर आमदार नवो…!
मोती तलावाकडे 4 दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ; सावंतवाडीत दीपक केसरकरांविरोधातील बॅनरची चर्चा, आता बदल हवो तर आमदार नवो…!
''एकनाथ शिंदेंना पुढं करुन कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटलांचा बळी घेतलाय''
''एकनाथ शिंदेंना पुढं करुन कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटलांचा बळी घेतलाय''
Exclusive MLA Babandada Shinde : तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
Mahatma Gandhi Letter To Adolf Hitler : महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
Nashik Crime: ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
Govinda Gun fire: चुकून नव्हे तर गोविंदाने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर स्वत:च दाबला? जबाबातील विसंगतीने पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली
गोविंदाच्या मिसफायरप्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांना वेगळाच संशय, 'हिरो नंबर वन'ने ट्रिगर स्वत:च दाबला?
Kolhapur News : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
Prakash Ambedkar: देशातील जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेला 'वंचित'ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर
देशातील जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेला 'वंचित'ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर
Embed widget