एक्स्प्लोर

Video | कोणाच्या आठवणीनं 'अंजली बाईं'ना सतावलं?

काही कलाकार हे त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. मालिका विश्वात अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात.

मुंबई : काही कलाकार हे त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. मालिका विश्वात अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. कैक वर्षे जुन्हा मालिकांतील कलाकार हे त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळेच प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. अगदी आताआताचं उदाहरण घ्यावं तर, ते म्हणजे 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका आणि त्यातील प्रत्येक पात्र. 

'राणा दा', 'अंजली', 'गोदाक्का'पासून अगदी 'बरकत'पर्यंत सर्वच पात्रांनी आणि ती साकारणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्य मनाचा ठाव घेतला होता. या मालिकेनं काही महिन्यांपूर्वी प्रेक्षांचा निरोप घेतला. असं असलं तरीही प्रेक्षकांच्या मनावर असणारी भुरळ काही कमी झालेली नाही. फक्त प्रेक्षकच नव्हे, तर मालिकेतील कलाकारांची त्यांनी साकारलेल्या पात्रांनी एक वेगळंच नातं जोडलं गेलं आहे, याचा प्रत्यय येत आहे अभिनेत्री अक्षया देवधर हिनं केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळं. 

'असा बेभान हा वारा...', या गाण्यावरील एक व्हिडीओ तिनं पोस्ट केला आहे. यामध्ये अक्षयाच्या चेहऱ्यावरील भाव नकळतच सर्वांच्या काळजाचा ठाव घेत आहेत. अंजलीची आपल्याला फार आठवण येत असल्याच्या आशयाचं कॅप्शन तिनं या व्हिडीओला जोडलं. 

तिनं हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर लगेचच चाहत्यांनीही कमेंट करत या व्यक्तीरेखेवर प्रेमाचा वर्षाव केला. शिवाय आपल्यालाही अंजलीबाई, राणा दा आणि मालिकेची फार आठवण येत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक फॉलोअर्सनी केल्या. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

एखादी कलाकृती साकारत असताना कलाकार मंडळी त्याकडे कामाच्याही पलीकडल्या नजरेतून पाहतात. एक आपलेपणाचं नातं ते या पात्राशी जोडू पाहतात. नकळतच मालिका किंवा एखाद्या कलाकृतीच्या निमित्तानं भूमिका साकारत असताना या भूमिकेतूनही ते खूप काही शिकतात. अक्षयाही या भूमिकेकडून खूप काही शिकली, तर अंजली बाई या पात्रानं तिलाही खूप काही दिलं. त्यामुळं अक्षया आणि अंजली या दोघींचंही एक वेगळं नातं या पोस्टच्या निमित्तानं सर्वांसमोर आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget