अभिनेत्याचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळला, चित्रपटसृष्टीत खळबळ; पोलिसांना हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
52 वर्षीय अभिनेता कलाभवन एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी या हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेल कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

Actor Kalabhavan Navas body found in hotel: मल्याळम चित्रपट अभिनेता आणि मिमिक्री कलाकार कलाभवन नवस 1ऑगस्ट रोजी संध्याकाळी कोची येथील चोट्टनिक्कारा येथील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले. 52 वर्षीय अभिनेता कलाभवन एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी या हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेल कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. 'पीटीआय'ने पोलिसांचा हवाला देत म्हटले आहे की, कलाभवनला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कलाभवन नवस यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा पोलिसांना संशय आहे. कलाभवन हॉटेलमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. ते 1 ऑगस्ट रोजी चेकआऊट करणार होते. असे सांगितले जात आहे की, 'प्रकंबनम' या मल्याळम चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात कलाभवन हॉटेलमध्ये थांबला होते. शुक्रवारी, 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी जेव्हा ते रिसेप्शनवर पोहोचले नाहीत तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी ताबडतोब जाऊन पाहिले. तेव्हा खोलीत बेशुद्धावस्थेत आढळले. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी निधनावर शोक व्यक्त केलाआहे.
शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण कळेल
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या खोलीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. कलाभवन यांचे आज कलामसेरी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवविच्छेदन केले जाईल. त्यानंतरच मृत्यूचे खरे कारण कळेल. कलाभवनचा मृतदेह सध्या छोटनीक्कारा येथील एसडी टाटा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर तो त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येईल.
मल्याळम अभिनेता कलाभवन कोण होते?
कलाभवन नवस मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा होते. त्यांनी 1995 मध्ये 'चैतन्यम' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 'मीनाक्षी कल्याणम', ज्युनियर मँड्रेक, 'चंदमामा', 'अम्मा अम्मयम्मा', 'माय डिअर कराडी' आणि 'मट्टुपेट्टी माचन' अशा अनेक मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी टीव्हीच्या जगातही काम केले आणि अनेक मालिकांमध्येही काम केले. कलाभवन हे देखील एक गायक होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्या कुटुंबात आता त्यांची पत्नी आणि तीन मुले आहेत. 2002 मध्ये त्यांचे लग्न झाले.
इतर महत्वाच्या बातम्या























