पुष्पा-2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, आता पुष्पा-3 येणार, भारतभरात रॅम्पेज होणार; जाणून घ्या काय असेल स्टोरी?
पुष्पा-2 या चित्रपटाला सध्या तुफान प्रतिसाद मिळत आहे. लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चित्रपटाची स्टोरी काय असू शकते, असे विचारले जात आहे.
Pushpa 3 Flim : सध्या सगळीकडे पुष्पा-2 याच चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे मोठे-मोठे रेकॉर्ड तोडले आहेत. 5 डिसेंबर 2024 रोजी हा चित्रपट प्रदिर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बम्पर कमाई केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहांवर अक्षरश: तुटून पडतायत. अनेक चित्रपटगृहांसमोर लांब-लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान, पुष्पा-2 या चित्रपटाला मिळत असलेला भन्नाट प्रतिसाद पाहून आता या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच पुष्पा-3 हा चित्रपट येणार का? असे विचारले जात आहे. यावरच आता नवी माहिती समोर आली आहे.
पुष्पा-3 येण्याची शक्यता?
अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पुष्पा: द राइज’ या पहिल्या भागात नायकाचा मोठं नाव कमवण्यासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. एक गाडी चालवणारा साध्या ड्रायव्हरपासून ते लाल चंदनाची त्सकरी करणाऱ्या एका सिंडिकेटचा प्रमुख होण्यापर्यंतचा प्रवास या पहिल्या भागात आहे. तर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात म्हणजेच 'पुष्पा- द रूल' या चित्रपटात पुष्पा हा आंतरराष्ट्रीय तस्कर बनल्याचे दाखवण्यात आले आहे. पुष्पा या चित्रपटात फायर न्हे तर वाईल्ड फायर झाला आहे. या चित्रपटात पुष्पा तिच्या आईचा सन्मानही परत मिळवून देतोय. त्यानंतर आता पुष्पा-3 हा चित्रपट येणार का? असे विचारले जात आहे. पुष्पा-2 चित्रपटातील कहाणी पाहून पुष्पा-3 हा चित्रपट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुष्पा-3 चित्रपटात काय असणार?
‘पुष्पा 3’ या चित्रपटाच्या कहाणीची सुरुवात पुन्हा एकदा जपानमधून होण्याची शक्यता आहे. ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाची सुरुवातच जपान या देशातून झालेली आहे. त्यावेळीच चित्रपटाची ही सुरुवात नव्हे तर क्लायमॅक्स आहे, असं सांगण्यात आलंय. जपानमध्ये लग्नसोहळ्यात एक प्रथा आहे. येथे नवरदेव आपल्या नवरीला एका महागडी भेटवस्तू देत असतो. ही भेटवस्तू एका गिटारसारखी असते. ही वस्तू रक्तचंदनापासून तयार केली जाते. म्हणूनच ती फार महाग असते. पुष्पा चित्रपटात नायक चंदन तस्कर आहे. त्यामुळेच आता पुष्पा चित्रपटाच्या तिसऱ्या भागात जपानच्या संदर्भानेच कथा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुष्पा-3 मध्ये विजय देवरकोंडा दिसणार?
पुष्पा-1 मध्ये पुष्पा हा सिंडिकेचा प्रमुख झालेला आहे. पुष्पा पार्ट 2 मध्ये पुष्पा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चंदनाची तस्करी करताना दिसतोय. तर पुष्पा चित्रपटाच्या तिसऱ्या पार्टमध्ये नायक लाल चंदन घेऊन थेट जपानमध्ये पोहोचणार आहे. पुष्पा-3 हा चित्रपट एका सुडाची कथा असण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुष्पा-3 या चित्रपटात विजय देवरकोंडा हा अभिनेता दिसण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे पुष्पा-3 या चित्रपटात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
मृत्यू झाला तरी नाव होणार अमर, 'या' बड्या अभिनेत्यानं केलं सर्वांना अभिमान वाटावं असं काम!