मला मराठी इंडस्ट्रीने नेहमीच नाकारलं, अनोळखी असल्याची ट्रीटमेंट; अभिजीत सावंतने खदखद बोलून दाखवली
Abhijeet Sawant : गायक अभिजीत सावंतने एबीपी माझाशी बोलताना खदखद बोलून दाखवलीये.

Abhijeet Sawant : "मराठी सिनेक्षेत्रात (Marathi Film Industry) नेहमी मला अनोळखी असल्याप्रमाणे ट्रिटमेंट मिळाली. मला नेहमी याचं आश्चर्य वाटतं. म्हणजे मराठी नसल्याप्रमाणेच ट्रिटमेंट मिळाली. मला ते नेहमीच हर्ट झालं", अशी खदखद गायक अभिजीत सावंतने (Abhijeet Sawant) बोलून दाखवली. अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) एबीपी माझाशी बोलताना याबाबत सविस्तर भाष्य केलंय.
View this post on Instagram
अभिजीत सावंत काय काय म्हणाला?
अभिजीत सावंत म्हणाले, मराठी प्रेक्षकांनी नेहमी मला आमचा मुलगा आहे, असं म्हटलं. तसं मराठी फिल्म इंडिस्ट्रीकडून असा फिल आला नाही. बिग बॉसमुळे मला मराठी प्रेक्षकांना भेटण्याची संधी मिळाली. मराठी इंडस्ट्रीतील लोकं मला आजही विचारतात की, तू मराठी फार चांगलं बोलतो. एवढं असू शकेल की, माझा कल जो होता, तो हिंदी इंडस्ट्रीकडे जास्त होता. कारण इंडियन आयडल एक हिंदी प्लॅटफॉर्म होता. माझे गुरु नॉर्थ इंडियन होते. पण मी मराठी मीडियम मधला मुलगा आहे. मी दादरच्या शाळेतील विद्यार्थी आहे. मी पुढे बॉटनी करणार होतो, ते सुद्धा मराठीतच करेन, असा विचार होता. माझ्या पहिली फिल्म ही मराठी लोकांसोबतची हिंदी फिल्म होती. मात्र, लोकांना माझ्याबद्दल भ्रम आहे, की हा हिंदी करणारा मराठी मुलगा आहे, असं म्हणू शकतो.
पुढे बोलताना अभिजीत सावंत म्हणाला, मला 2005 मध्ये विचारण्यात आलं होतं. पुढे काय? मी म्हणालो होतो मला 5 वर्षांमध्ये प्ले बॅक सिंगर बनायचं आहे. खरं म्हटलं तर मला पॉप म्युजिकमध्ये जास्त प्रेम होतं. मात्र, मी तेवढा प्लेबॅक सिंगिंगमध्ये नाही राहिलो. त्यामुळे तुमची स्वप्न पूर्ण होतील, याची गॅरंटी नाही. आपल्या हातात जे आलंय, ते व्यवस्थित करणे हे आपल्या हातात आहे. ते करणेच जास्त महत्त्वाचे आहे. माझ्यासारखा माणूस इथे 20 वर्षे काढू शकतो तर कोणीही काढू शकतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या























