Dipika Kakar Liver Tumor: दीपिका कक्करच्या पोटात टेनिस बॉलच्या साइजचा ट्यूमर, आणखी काही टेस्ट बाकी; नवऱ्याने दिली हेल्थ अपडेट
Dipika Kakar Liver Tumor: प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करच्या पोटात ट्यूमर आढळला आहे. दीपिकाच्या नवऱ्याने याबाबतची अपडेट दिली आहे. दीपिकाला नेमकं काय झालं आहे हे त्याने सांगितलं.

Dipika Kakar Liver Tumor: प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर आता टीव्हीवर दिसत नाही पण ती व्लॉग्सद्वारे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. दीपिका आणि शोएब दोघेही व्हीलॉग करतात आणि चाहत्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल अपडेट देत राहतात. आता शोएबने दीपिकाबद्दल एक खुलासा केला आहे ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांची काळजी वाटू लागली आहे. चाहते दीपिकासाठी प्रार्थनाही करू लागले आहेत. शोएबने त्याच्या एका पोस्टमध्ये खुलासा केला आहे की दीपिकाला एक गंभीर आजार झाला आहे. ज्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक आहे.
दीपिका आणि शोएब सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्याबद्दल अपडेट देत राहतात. चाहत्यांना त्यांच्या घरात काय चालले आहे ते सर्व माहिती आहे. चाहतेही त्याच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. दीपिका आणि शोएब दोघांचेही चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिम यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की दीपिकाच्या यकृतात (Liver) टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आढळला आहे.
शोएबने त्याच्या व्लॉगमध्ये सांगितले...
शोएबने त्याच्या व्लॉगमध्ये सांगितले आहे की, दीपिकाच्या यकृताच्या डाव्या भागामध्ये ट्यूमर आहे. ही गाठ आकाराने बरीच मोठी आहे. यावेळी शोएबचा चेहरा खूपच उदास दिसत होता. शोएब म्हणाला, दीपिकाची तब्येत ठीक नाहीये, तिला पोटाचा काही त्रास आहे. जो खूप गंभीर आहे. शोएबने याबाबत माहिती देताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी दीपिकाला पोटदुखीची समस्या जाणवू लागली होती. सुरुवातीला त्यांनी अॅसिडिटी समजून घरीच उपचार केले. मात्र जेव्हा वेदना कमी झाल्या नाहीत तेव्हा त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, दीपिकाच्या यकृताच्या डाव्या भागात टेनिस बॉलसारखा ट्यूमर आहे. हे ऐकल्यावर दीपिका आणि शोएब दोघांचीही चिंता वाढली. ट्यूमर कर्करोगाचा असण्याची शक्यता वाटत होती. मात्र CT स्कॅन रिपोर्टमध्ये कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. तरीही खात्री करण्यासाठी काही अतिरिक्त चाचण्या करण्यात येणार आहेत.
दीपिका गेल्या 3 दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होती. तिला काल( गुरूवारी15 मे) रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी तिला रुग्णालयातच राहण्याचा सल्ला दिला होता पण शोएबने ठरवलं की घरातील शांत वातावरणात तिला अधिक आराम मिळेल. दीपिकाच्या यकृतातील ट्यूमरवर फक्त शस्त्रक्रियेद्वारेच उपचार होऊ शकतात. त्यामुळे लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शुक्रवार 16 मे रोजी दीपिका एका आघाडीच्या यकृत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणार असल्याचं शोएबने सांगितलं आहे. कर्करोगाची शक्यता नाकारली असली तरी रक्त चाचणीद्वारे अधिक स्पष्टता मिळणार आहे. या तपासणीचा रिपोर्ट शुक्रवारपर्यंत येणार आहे आणि त्याची संपूर्ण कुटुंबीय आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या वडिलांच्या आजारपणात प्रार्थना केल्या तशाच प्रार्थना दीपिकासाठीही करा. सध्या कोणतेही नकारात्मक विचार न करता फक्त तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा, असंही शोएबने म्हटलं आहे.
खरंतर मी चंदीगडला होतो आणि दीपिका मुंबईत होती आणि तिला पोटदुखी होत होती. दीपिकाला वाटले की ही एक सामान्य वेदना आहे, पण जेव्हा ती वाढली तेव्हा तिने तिला डॉक्टरकडे नेले. काही रक्त चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्याच्या पोटात संसर्ग झाल्याचे उघडकीस आले. शोएब पुढे म्हणाला, आमच्या डॉक्टरांनी आम्हाला फोन केला आणि सांगितले की आम्हाला सीटी स्कॅन करावे लागेल. रिपोर्टमध्ये दीपिकाच्या यकृताच्या डाव्या भागामध्ये ट्यूमर आहे. तेही टेनिस बॉलच्या आकाराचे. हे आपल्या सर्वांसाठी खूप धक्कादायक आहे. शोएब पुढे म्हणाला, आम्हाला सर्वांना फक्त काळजी होती. आतापर्यंत अहवालात असे काहीही आलेले नाही. ही दिलासा देणारी बाब आहे. अजून अनेक चाचण्या करायच्या आहेत, असंही त्याने पुढे सांगितलं आहे.


















