एक्स्प्लोर

Aastad Kale Shared Post On Rohit Arya: पवईतील रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी मराठी अभिनेत्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, म्हणाला...

Aastad kale Shared Post On Rohit Arya: रोहित आर्यच्या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच आता मराठी अभिनेता अस्ताद काळेनंही संशय व्यक्त केला आहे.

Aastad Kale Shared Post On Rohit Arya: मुंबईतील (Mumbai News) पवईत (Powai) घडलेल्या घटनेनं सर्वांनाच हादरवलं आहे. पवईतील महावीर क्लासिक इमारतीमध्ये असणाऱ्या आर. ए. स्टुडिओत रोहित आर्य (Rohit Aary) नावाच्या व्यक्तीनं तब्बल 17 मुलांसह 20 जणांना ओलीस ठेवलेलं. संपूर्ण शहरात बातमी पसरली आणि खळबळ माजली. वेब सीरिजच्या ऑडिशनसाठी मुलांना बोलावण्यात आलेलं. पण, त्यानंतर जे घडलं ते खरंच अंगावर काटा आणणारं होतं. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. स्टुडिओत शिरलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यवर गोळी झाडली आणि एन्काउंटर केला. थेट छातीत गोळी लागल्यानं आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. पण, त्यानंतर आरोपी रोहित आर्यच्या एन्काउंटरवरुन अनेक प्रश्न विचारण्यात आले. सोशल मीडियावरही अनेकांनी याप्रकरणी संशय व्यक्त केला. कारण, रोहित आर्य पहिल्यापासूनच सरकावर गंभीर आरोप करत होता. त्यामुळे रोहित आर्यच्या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित केले जात होते. अशातच आता मराठी अभिनेता अस्ताद काळेनंही (Astad Kale) याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  

मराठमोळा अभिनेता आस्ताद काळे म्हणजे, मराठी मनोरंजनविश्वातला गाजलेला चेहरा. मराठी मालिकांमध्ये त्यानं अनेक उल्लेखनिय भूमिका साकारल्या आहेत. अशातच तो 'बिग बॉसमध्येही दिसून आलेला. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तसेच, राजकीय असो वा इतर काहीही प्रत्येक विषयांवर आपलं मत नेहमीच मांडत असतो. अशातच आता आस्ताद काळेनं पवईतील रोहित आर्य प्रकरणावरही सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तसेच, मोठा संशय व्यक्त केला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aastad Sunita Pramod Kale (@aastadkale)

आस्ताद काळे सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये काय म्हणाला? 

अभिनेता आस्ताद काळेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. रोहित आर्यनं मुलांना ओलीस ठेवल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलेला आणि आपल्या मागण्या सांगितलेल्या. तोच व्हिडीओ आस्तादनं शेअर केलाय आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "कोणालाही असं ओलीस धरणं हे चुकीचंच आहे. हा शेवटचा मार्ग "आपलं म्हणणं ऐकलं" जावं म्हणून अवलंबावा लागणं हे दुर्दैवी आहे आणि पायात/दंडात गोळी घालून त्याला ताब्यात न घेता Vital Organs ना निशाणा बनवणं हे संशयास्पद आहे. एवढंच..."

आस्ताद काळेनं पोस्टच्या शेवटी लिहिलंय की, "बाकी... जय हिंद... जय महाराष्ट्र! ता.क:- हे असेच आपले आवाजही बंद करायला येतील. बागुलबुवा खरा ठरेल." 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Hemant Dhome On Pune Shirur Leopard Attack: 'आधीच अस्मानी संकटानं कंबरडं मोडलंय त्यात बिबट्याचं जंगली संकट...'; हेमंत ढोमेनं सांगितली शिरूर तालुक्याची व्यथा

महत्त्वाच्या बातम्या

अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget