एक्स्प्लोर

Aai Tuljabhavani Colours Marathi Serial: तुळजा-जगदंबा आमनेसामने उभ्या ठाकणार; देवीसमोर मत्सराचं रहस्य उलगडणार

Aai Tuljabhavani Colours Marathi Serial: आई तुळजासमोर उभी राहिलेली जगदंबा ठामपणे म्हणते "तुळजाई, मत्सर कोण आहे, हे मी शोधून काढलंय! उमा हीच मत्सर आहे!" देवी तुळजा स्तब्ध होते, तिच्या चेहऱ्यावरचा अविश्वास आणि धक्का स्पष्ट दिसतो.

Aai Tuljabhavani Colours Marathi Serial: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) लोकप्रिय मालिका 'आई तुळजाभवानी' (Aai Tuljabhavani) आता एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. देवींच्या शक्तींचा संग्राम, देवीच्या मनुष्य रुपातील भावनिक नात्यांची कसोटी आणि 'मत्सर' नावाच्या दुष्ट शक्तीचा प्रभाव या सगळ्यांनी कथानक अधिकच तीव्र बनवलं आहे. तुळजादेवीच्या मंदिरात घडणारा देवीचं बालरूप 'जगदंबा' आणि प्रत्यक्ष तुळजाभवानी यांच्यातील आमनासामना प्रेक्षकांना अक्षरशः थरारून टाकणारा ठरणार आहे. आई तुळजासमोर उभी राहिलेली जगदंबा ठामपणे म्हणते "तुळजाई, मत्सर कोण आहे, हे मी शोधून काढलंय! उमा हीच मत्सर आहे!" देवी तुळजा स्तब्ध होते, तिच्या चेहऱ्यावरचा अविश्वास आणि धक्का स्पष्ट दिसतो. त्याचवेळी उमा शांत पण गूढ भावाने समोर येते. तिच्या स्थिर नजरेत आणि तिरकस स्वरात अघटीत गूढ दडलेलं आहे.

आई तुळजा विश्वास ठेवायला तयार नसते, पण जगदंबा निर्धाराने उभी राहते. तिच्या भोवती शक्तिचं तेज पसरतं, मंदिर हादरू लागतं, वारा सुटतो, दिव्यांची ज्योत विझते आणि गगनात विजांचा कडकडाट होतो. पुढच्याच क्षणी जगदंबा तिच्या अतिउग्र नऊवारी रूपात साक्षात देवीच्या तेजस्वी अवतारात प्रकट होते आणि उमावर प्रहार करते !! “उमाचं सत्य जगदंबा उलगडणार!” हा क्षण समोर उभा ठाकतो… त्याचा शेवट कसा होणार? या अद्भुत दैवी प्रसंगाचा परिणाम काय होणार? याची अत्यंत उत्कंठावर्धक गोष्ट मालिकेत पाहायला मिळेल. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

चारही शक्तीपीठांची जागृती, मायावी दुष्काळाचा अंत आणि देवीच्या वचनांची पूर्ती झाल्यानंतर सुडाने पेटलेल्या दितीमाता आणि शुंभा यांनी रचलेला नवीन डाव ‘मत्सर रिपू’ आता जगदंबेच्या मनात शिरला आहे. तुळजा आणि उमामधील घट्ट नातं पाहून जगदंबेच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. तुळजाने उच्चारलेलं “असा मत्सर करू नकोस” हे वाक्य तिच्या मनाला भिडतं आणि तिला जाणवतं की 'मत्सर' हा फक्त बाहेरचा शत्रू नाही, तर तिच्या अंतर्मनातही प्रवेशला आहे.

याच जाणीवेने ती सावध बनते आणि कुटुंबातील प्रत्येकावर लक्ष ठेवू लागते. उमा आणि तुळजाचं आई-मुलीचं नातं पाहून तिच्या मनात संशय वाढतो आणि शेवटी देवीच्या मंदिरात घडतो आमनासामना जिथे सत्य आणि भ्रम, प्रेम आणि अहंकार, देवीत्व आणि मत्सर यांच्या संघर्षाचा विस्फोट होतो.

उमा खरोखरच ‘मत्सर’ आहे का? की कुणाचातरी कपटी खेळ आहे? तुळजा जगदंबेवर विश्वास ठेवेल का, की या संघर्षामुळे देवींच्या नात्यात कायमचा तडा जाईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. या महासप्ताहात. 

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget