Aai Kuthe Kay Karte : आणखी एक जोडी तुटणार! यशला सोडून गौरी अमेरिकेला जाणार?
Aai Kuthe Kay Karte : 26 वर्ष एका चार भितींच्या घरात अडकलेल्या अरुंधतीने आता बाहेरच्या जगात स्वतःच हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
Aai Kuthe Kay Karte : मनोरंजन विश्वात ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा चांगलाच बोलबाला आहे. या मालिकेची आगळीवेगळी संकल्पना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील ‘आई’ने अर्थात ‘अरुंधती’ने समाजाची चौकट मोडून आता गगनभरारी घेतली आहे. 26 वर्ष एका चार भितींच्या घरात अडकलेल्या अरुंधतीने आता बाहेरच्या जगात स्वतःच हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. पायातील बेडी बनलेलं नातं तोडून अरुंधती आता मुक्तपणे विहार करत आहे. मात्र, आता या मालिकेत आणखी एक जोडी दुरावणार आहे.
अरुंधतीचा मुलगा यश आणि त्यांची होणारी पत्नी गौरी यांची पुन्हा एकदा ताटातूट होणार आहे. आधी अनिरुद्ध-अरुंधती, अभिषेक-अंकितानंतर आता यश आणि गौरी देखील एकमेकांपासून दुरावणार आहेत. गौरी आणि यश यांचा साखरपुडा पार पडला आहे. फॅशन डिझायनर असलेल्या गौरीला आता अमेरिकेतून नोकरीची संधी चालून आली आहे. गौरीच्या करिअरचा विचार करून यशने देखील तिला अमेरिकेला जाण्यास पाठींबा दिला आहे. पण आता यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होणार आहे.
गौरी स्वीकारणार का अमेरिकन कंपनीची ऑफर?
एका फॅशन स्पर्धेसाठी गौरीने तिची डिझाईन पाठवली होती. या डिझाईनमुळेच तिला ही ऑफर आली आहे. या स्पर्धेत जगातील 25 देशांमधील मुलांना अमेरिकेतील नामांकित डिझायनरकडे शिकण्याची आणि काम करण्याची संधी मिळाली आहे. यात भारतातून गौरीची निवड झाली आहे. यासाठी तिला तब्बल 2 वर्ष अमेरिकेत राहावं लागणार आहे. एकीकडे करिअर आणि दुसरीकडे प्रेम, अशा कात्रीत गौरी अडकली आहे. पण, ती अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेणार आहे. यामुळे आता मालिकेचा पुढचा ट्रॅक काय असेल? यश आता एकटा पडेल का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा :
- Chhavi Mittal, Mohit Hussein : ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज, अभिनेत्री छवी मित्तलने रुग्णालयातच साजरा केला लग्नाचा वाढदिवस!
- Rakesh Maria Biopic : माजी पोलीस आयुक्त राकेश मारियांचा बायोपिक येणार! रोहित शेट्टी करणार दिग्दर्शन
- Shah Rukh Khan : कडक उन्हामुळे हैराण झालेल्या चाहतीची शाहरुखकडे अजब मागणी! ट्विट करत म्हणाली...