Shah Rukh Khan : कडक उन्हामुळे हैराण झालेल्या चाहतीची शाहरुखकडे अजब मागणी! ट्विट करत म्हणाली...
Heat Wave : वाढत्या उन्हामुळे सगळेच हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून अंगाची लाही-लाही होतेय. यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरतोय.
Heat Wave : सध्या उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Wave) महाराष्ट्राचा पार इतका वाढला आहे की, घराबाहेर पडणे देखील अशक्य वाटू लागले आहे. वाढत्या उन्हामुळे सगळेच हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून अंगाची लाही-लाही होतेय. यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरतोय. महारष्ट्रात तर काही ठिकाणी तापमान 46 अंशांपर्यंत पोहोचलंय. त्यामुळे उष्मघाताची देखील भीती आहे. अशाच वाढत्या उन्हामुळे हैराण झालेल्या एका चाहतीने ट्विट करत चक्क ‘रोमान्स किंग’ अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याला एक विनंती केली आहे.
ट्विटर युझर आणि शाहरुख खानची चाहती असलेली सृष्टी पांडे हिने या वाढत्या तापमानात, हास्याचा गारवा मिळवण्यासाठी एक अनोखा आणि हटके मार्ग निवडला आहे. तिने एक ट्विट करत, त्यात शाहरुख खानला टॅग केले आहे. यात तिने शाहरुखच्या ‘कभी ख़ुशी कभी गम’चा संदर्भ दिला आहे. या चित्रपटात ‘सूरज हुआ मधम’ अशा बोलांचे एक गाणे आहे. याच गाण्याच्या शब्दांचा वापर करत तिने ही वाढती उष्णता कमी करण्याची विनंती किंग खानकडे केली आहे.
पाहा ट्विट :
सृष्टीच्या या ट्विटवर आता किंग खानचे चाहते देखील भरभरून कमेंट्स करू लागले आहेत. नेटकरी याच गाण्याच्या पुढच्या ओळी कमेंट्समध्ये लिहित आहेत. या ट्विटमुळे शाहरुख खानची ही चाहती चांगलीच चर्चेत आलीये.
हाय गर्मी...
एप्रिल महिन्यात उष्णतेचे सर्व विक्रम मोडीत निघताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तापमानाच्या पारा 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच यंदाचा एप्रिल महिना देशातील उकाड्याचे सर्व विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. भारतातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण एप्रिल होण्याच्या मार्गावर आहे. साधारणपणे मे महिन्याच्या मध्यानंतर जेवढं तापमान असतं तेवढं तापमान एप्रिल महिन्यात वाढलं आहे.
हेही वाचा :
- Lock Upp : ‘खूप प्रयत्न केले आई होण्यासाठी, पण...’, कंगनाच्या जेलमध्ये पायल रोहतगीला अश्रू अनावर!
- ‘माता सीता’च्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचल्या, आता राजकारणातही सक्रिय झाल्या दीपिका चिखलिया!
- ‘सलाम बॉम्बे’ ते ‘अंग्रेजी मीडियम’, ‘या’ चित्रपटांमधून कायम लक्षात राहील इरफान खान!
मुंबईतही मागील दोन दिवसांत तापमान पुन्हा 38 अंशांपर्यंत गेलंय. त्यामुळे उसाचा गाड्यांवर गर्दी, अंगावर स्कार्फ, छत्री, आणि पाण्याच्या बॉटल्स बघायला मिळत आहेत.