एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : आशुतोषच्या गाडीचा भीषण अपघात! मित्र गमावण्याच्या भीतीने अरुंधतीला प्रेमाची जाणीव होणार?

Aai Kuthe Kay Karte : अरुंधती आणि आशुतोष हे एकमेकांचे कॉलेजपासून मित्र आहेत. मात्र, आशुतोषसाठी अरुंधती त्याचं पहिलं प्रेम आहे.

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte ) मालिकेमध्ये आता आशुतोष आणि अरुंधतीच्या आयुष्यात आता प्रेम फुलणार आहे. मात्र, यानिमित्ताने मालिकेत एक नवा ट्विस्ट येताना दिसणार आहे. एकीकडे अरुंधती आणि आशुतोष एकत्र गाणं गाणार आहेत. तर, दुसरीकडे आता आशुतोषच्या गाडीला मोठा अपघात होणार आहे. यामुळे अरुंधतीला तिच्या प्रेमाची जाणीव होणार आहे. अरुंधती आणि आशुतोष हे एकमेकांचे कॉलेजपासून मित्र आहेत. मात्र, आशुतोषसाठी अरुंधती त्याचं प्रेम आहे.

आशुतोषनेच अरुंधतीला तिच्या आयुष्यात एक नवीन प्रवास सुरु करण्याची प्रेरणा दिली. ‘सुखाचे चांदणे’ रिलीज झाल्यानंतर नुकतंच अरुंधतीने संगीतकार निलेश मोहरीर यांच्यासाठी एक चित्रपट गीत रेकॉर्ड केलं. या गाण्यानंतर आता अरुंधतीकडे नव्या गाण्यांची रीघ लागली आहे. एका अशाच दिग्दर्शकाने अरुंधती आणि आशुतोष यांना एकत्र भेटायला बोलवून अरुंधतीला दोन नवी गाणी ऑफर केली आहेत. आगामी मराठी चित्रपटासाठी ही गाणी असणार आहेत. यातील एक गाणे एकटी अरुंधती गाणार आहे. तर, दुसरे गाणे अरुंधती आणि आशुतोष मिळून गाणार आहेत.

आशुतोषचा अपघात होणार!

नव्या गाण्याची आनंदाची बातमी घेऊन घरी जात असताना आशुतोषच्या गाडीला मोठा अपघात होणार आहे. आशुतोष आणि नितीन दोघे घरी परतत असताना, त्यांच्या गाडीसमोर अचानक एक वृद्ध व्यक्ती येते. त्या व्यक्तीला वाचवण्याच्या नादात नितीन गाडी पटकन बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याचवेळी गाडी जोरात भिंतीवर जाऊन आदळते आणि दोघांचा भीषण अपघात होतो. या अपघातात नितीनला थोडाच मार लागतो. मात्र, आशुतोषला गंभीर दुखापत होते.

अरुंधतीला होणार प्रेमाची जाणीव!

या भीषण अपघातानंतर आशुतोषला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आशुतोषचा अपघात झाल्याची बातमी ऐकून अरुंधतीलाही जबर धक्का बसला आहे. आशुतोषला बघायला अरुंधती धावतपळत हॉस्पिटलमध्ये जाते. तर, आशुतोषला काहीच होणार नाही, असा विश्वास ती सगळ्यांना देत आहे. याच वेळी आशुतोषला रुग्णशय्येवर पाहून अरुंधतीला तिच्या प्रेमाची जाणीव होणार आहे. आशुतोषला गमावण्याच्या भीतीने अरुंधतीचा जीव देखील पाणी पाणी झाला आहे. यामुळेच आता मालिकेत आशुतोष बरा झाल्यानंतर दोघांच्या आयुष्यात प्रेमाचा नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget