Harshvardhan Rane On His Father: 'माझ्या वडिलांना मी 5-6 पार्टनर्ससोबत लपूनछपून पाहायचो...'; 'सनम तेरी कसम' फेम अभिनेत्याचा खुलासा
Harshvardhan Rane On His Father: हर्षवर्धन राणेला इंडस्ट्रीत खरी ओळख मिळाली ती 'सनम तेरी कसम' सिनेमामुळे, ज्यामध्ये त्यानं रोमँटिक हिरोची भूमिका साकारली होती.

Harshvardhan Rane On His Father: 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) फेम अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) त्याच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा 'एक दीवाने की दिवानियात' (Ek Deewane Ki Deewaniyat) सिनेमा रिलीज झाला असून चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हर्षवर्धन राणेला (Harshvardhan Rane) इंडस्ट्रीत खरी ओळख मिळाली ती 'सनम तेरी कसम' सिनेमामुळे, ज्यामध्ये त्यानं रोमँटिक हिरोची भूमिका साकारली होती. अशातच आता एका मुलाखतीत बोलताना हर्षवर्धनने राणेनं त्याला रोमँटिक भूमिका आवडत असल्याचं उघड केलं आहे.
रोमँटिक भूमिकांबाबत काय म्हणाला हर्षवर्धन राणे?
फिल्मफेयरशी बोलताना हर्षवर्धन राणे म्हणाला की, "मी माझ्या वडिलांना वेगवेगळ्या वेळी 5-6 पार्टनर्ससोबत पाहिलेलं, मी लपूनछपून त्यांना पाहायचो. त्यांचं प्रेम, इमोशनल कनेक्ट आणि नातेसंबंधांमधलं प्रेम समजून घेण्याचा प्रयत्न करायचो. लहानपणी मी त्यांच्या भावना समजून घ्यायचो."
सोनमसोबचा स्क्रिन शेअर करतानाचा अनुभव सांगताना हर्षवर्धन राणे काय म्हणाला?
अभिनेत्यानं सोनम बावजासोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला. त्यानं तिचं एक प्रचंड क्षमता असलेली अभिनेत्री म्हणून वर्णन केलं. तसेच, तिच्या प्रामाणिकपणाची आणि इमोशनल असण्याचं कौतुक केलं. तो म्हणाला की, "सोनम ही केवळ एक यशस्वी प्रोफेशनल अभिनेत्री नाही तर, एक सशक्त अभिनेत्री देखील आहे जी कोणत्याही सीनमध्ये, अगदी शांततेतही स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्यास सक्षम आहे..."
हर्षवर्धननं 2016 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनसोबत 'सनम तेरी कसम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रिलीज झाल्यानंतर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही, पण सोशल मीडियावर या सिनेमाची मोठी क्रेझ पाहायला मिळाली. पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमानं बॉक्स ऑफिसचे सर्वच्या सर्व रेकॉर्ड्स मोडले.
दरम्यान, मिलाप झवेरी दिग्दर्शित 'एक दीवाने की दीवानियत' सिनेमात सोनम बाजवा देखील मुख्य भूमिकेत आहे. शाद रंधावा, सचिन खेडेकर, अनंत नारायण महादेवन आणि राजेश खेडा हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि थमाशी टक्कर होऊनही, चित्रपटानं 20 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :

















