एक्स्प्लोर

Dhurandhar 2 vs Tumbbad 2: 200 दिवस शुटिंग, 8 एकरचा सेट; 'धुरंधर 2' वैगरे विसरा, 'हा' सिनेमाच ठरणार बॉक्स ऑफिसचा खरा ब्लॉकबस्टर

Dhurandhar 2 vs Tumbbad 2: 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'तुंबाड' (Tumbbad) सिनेमानं हॉरर सिनेमा वर्ल्डमध्ये स्वतःचं एक अद्वितीय स्थान निर्माण केलं आहे.

Dhurandhar 2 vs Tumbbad 2: सध्या बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar 2 Box Office Collection) 'धुरंधर : द रिवेंज' धुमाकूळ घालतोय. आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) स्टारर असलेला हा सिनेमा 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) धुवांधार कमाई करतोय. आता सध्या तरी 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिसवर आपला चांगलाच जम बवसला आहे. बॉक्स ऑफिसवरची 'धुरंधर'ची घौडदौड पाहून भल्याभल्या दिग्गजांची झोप उडाली आहे. पण, एक सिनेमात 'धुरंधर 2'चं वादळ क्षमवण्याची ताकद आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. खरं तर हा सिनेमा 2018 मध्ये आलेल्या एका सिनेमाच सीक्वेल आहे. ज्याची सारेच आतुरतेनं वाट पाहत आहेत. याच्या पहिल्या पार्टनं बॉक्स ऑफिसवर चांगलाच जम बसवलेला आणि जोरदार कमाईही केली होती. आजही या सिनेमाचं अनेकजण कौतुक करतात. 

2018 मध्ये रिलीज झालेल्या 'तुंबाड' (Tumbbad) सिनेमानं हॉरर सिनेमा वर्ल्डमध्ये स्वतःचं एक अद्वितीय स्थान निर्माण केलं आहे. या सिनेमाची प्रेरणा एका मराठी लोककथेतून घेण्यात आली होती. त्याची वैशिष्ट्यपूर्ण कथा आणि सिनेमा पाहण्याचा अनुभव यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला. आता, सिनेमाचा निर्माता सोहम शाहनं या सिनेमाच्या सीक्वेलची म्हणजेच, 'तुंबाड 2' (Tumbbad 2) ची घोषणा केल्यापासून, या प्रकल्पाविषयी प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता आणखीच वाढली आहे. 

'तुंबाड 2'च्या शुटिंगची जोरदार तयारी सुरू (Tumbbad 2 May Hit On Box Office)

'तुंबाड 2'च्या अधिकृत घोषणेनंतर, आता सिनेमाच्या निर्मितीचं काम सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाशी संबंधित एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सीक्वेलचं शुटिंग अत्यंत भव्य प्रमाणावर केलं जातंय. या सिनेमाचं शुटिंग 200 हून अधिक दिवस चालण्याची अपेक्षा आहे. केवळ ही एकच बाब या निर्मितीच्या प्रचंड व्याप्तीवर प्रकाश टाकते. सिनेमाच्या भव्यतेचा विचार करता, प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह असणं अगदी स्वाभाविक आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sohum Shah (@shah_sohum)

मुंबईत उभारण्यात आलाय एक भव्य सेट

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमासाठी सध्या मुंबईमध्ये 7 ते 8 एकर जागेवर पसरलेला एक प्रचंड मोठा सेट उभारला जात आहे. एखाद्या संपूर्ण शहरासारखा दिसेल, अशा प्रकारे रचलेला हा सेट, शुटिंगच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी मुख्य पार्श्वभूमी म्हणून काम करेल आणि प्रेक्षकांना एक खरोखरंच भव्य असा सिनेमॅटिक अनुभव देण्याचं वचन देतो. या सिनेमात सोहम शाह पुन्हा एकदा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे, तर त्याच्या सोबतीनं नवाजुद्दीन सिद्दीकी देखील पडद्यावर झळकणार आहे.

कधी रिलीज होणार सिनेमा? (Tumbbad 2 Release Date)

'सोहम शाह फिल्म्स' आणि 'पेन स्टुडिओज' यांच्या बॅनरखाली निर्मिती होणारा हा सिनेमा, या वर्षाच्या उत्तरार्धात शुटिंगसाठी फ्लोरवर जाणार आहे. 'पेन स्टुडिओज' हे 'आरआरआर' (RRR) आणि 'गंगूबाई काठियावाडी' यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांसाठी विशेष ओळखलं जातात. या निर्मितीसंस्थांच्या सिनेमांचा दर्जा पाहता, आता 'तुंबाड 2' (Tumbbad 2) बद्दलही मोठी चर्चा सुरू झाली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांसाठी खरोखरंच अद्वितीय असा सिनेमॅटिक अनुभव देईल, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे रिलीजच्या काहीच दिवसांत एक हजार कोटींच्या पार कमाई केलेल्या 'धुरंधर 2'चं वादळ क्षमवण्याची क्षमता याच सिनेमात आहे, असं बोललं जातंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dhurandhar 2 VS Project Hail Mary: 2 तास 36 मिनिटांच्या 'या' फिल्मनं 'धुरंधर 2'ला लोळवलं; तीनच दिवसांत 1300 कोटींहून अधिक कलेक्शन

महत्त्वाच्या बातम्या

'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
Bollywood Actress Disco Shanti: 14 वर्षांत 900 फिल्म्स, पोटची लेक गमावली, पतीच्या निधनानं बदललं आयुष्य, आता 61व्या वर्षी कमबॅक करण्याच्या तयारीत 'डिस्को शांती', ओळखलं का कोण?
14 वर्षांत 900 सिनेमांत काम, लेकीला गमावलं, पतीच्या निधनानंतर आयुष्य बदललं; 61 व्या वर्षी 'डिस्को शांती' करणार कमबॅक, ओळखलं का कोण?
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget