एक्स्प्लोर

महाराष्ट्रात यलो डे; उमेदवारांपासून कुटुंबीय, नेत्यांपासून कार्यकर्ते पिवळे जर्द

उमेदवारापासून कुटुंबीयांपर्यंत आणि नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळे पिवळे

मुंबई : उमेदवारी अर्ज भरताना आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जणू भंडाराच उधळला होता. उमेदवारापासून कुटुंबीयांपर्यंत आणि नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळे पिवळे... सोलापुरात प्रणिती शिंदेंनी पिवळा धम्मक चुडीदार परिधान केला होता आणि सोबत होता ढोल ताशा. योगायोग म्हणजे प्रणिती शिंदे यांचे प्रतिस्पर्धी दिलीप मानेही पिवळ्या रंगात रंगले होते आणि ते चक्क बुलेटवरुन दाखल झाले. परळीत भाऊ-बहिण एकाच रंगात परळीत पक्के वैरी असलेले सख्खे चुलत बहीण-भाऊ पिवळे जर्द झाले होते. पंकजा मुंडे यांनी नवरात्रीचा आजचा कलर फॉलो केला होता. तर धनंजय मुंडेंनीही पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार धनगरी वेशभूषा कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी थेट धनगरी वेशभूषा केली होती. विराट पदयात्रेला संबोधित करताना पिवळ्या कुर्त्यासह रोहित पवारांनी खांद्यावर घोंगडंही घेतलं होतं. पुण्यातील उमेदवारही पिवळी धम्मक लोकमान्य टिळक यांच्या वंशज आणि भाजप उमेदवार मुक्ता टिळक यांनीही रॅलीमध्ये पिवळी धमक साडी परिधान केली होती. इतकंच काय कार्यकर्ते तर आधीच पिवळे धम्मक झाले होते भुजबळांचाही यलो डे खरंतर नवरात्रीतले रंग फॉलो करण्याचा ट्रेन्ड महिलांमध्ये जास्त असतो. पण यंदा पुरुषही मागे नाहीत. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी पारंपरिक पांढरा रंग सोडून पिवळ्याला आपलंसं केलं. बाकी मफलर मात्र भुजबळांनी सोडला नाही. तर शिवसेनेच्या निर्मला गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना पिवळी साडी नेसली होती. आदित्य ठाकरेंच्या मातोश्रीही पिवळ्या रंगात इकडे मुंबईतही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे पिवळ्या कपड्यांमध्ये येतील असं वाटलं होतं. पण ही कसर त्यांच्या मातोश्रींनी भरुन काढली. पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेल्या रश्मी ठाकरे आदित्य यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होत्या आणि शिवाय कार्यकर्ते होतेच. तर आशिष शेलार यांच्या पत्नीनेही पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. पिवळा रंग हा लक्ष्मीचा आवडता रंग असं म्हणतात. आता मतांच्या रुपाने मिळणारी लक्ष्मी कुणाला पावते ते 24 ऑक्टोबर रोजी पाहूया.

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil on Gokul Chairman Election 2026: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महायुती सरकारकडून गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अखेर ज्याची भीती होती तेच झालं, गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Gokul Election 2026: गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
अमेरिकेच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
Satara District Bank Election Result 2026: राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget