एक्स्प्लोर
Advertisement
सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनील तटकरेंवर भाजपने कारवाई का केली नाही? : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नाशिक येथे सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी सिंचन घोटाळ्यावरुन सत्ताधारी भाजप-शिवसेनेला प्रश्न विचारले.
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नाशिक येथे सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी सिंचन घोटाळ्यावरुन सत्ताधारी भाजप-शिवसेनेला प्रश्न विचारले. "2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षात असलेल्या भाजप-शिवसेनेने 72 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाला असल्याची बोंब मारली होती. या घोटाळ्यावरुन भाजपने सत्ताधाऱ्यांवर आणि प्रामुख्याने अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. जर या लोकांनी घोटाळा केला होता, तर सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने अजित पवार आणि सुनील तटकरेंवर कारवाई का केली नाही?" असा सवाल अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
भारतीय जनता पक्षाच्या सांगलीत आयोजित सभेत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी विचारले होते की, 72 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचं काय झालं? शाह यांच्या या विधानाचा राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले की, "सत्ताधारी तुम्ही आहात या घोटाळ्याचे पुढं काय झालं हे तुम्ही सांगा, आम्हाला काय विचारता. तुम्ही सत्तेत असून कोणावरही कारवाई का केली नाहीत, याची उत्तरं द्या."
UNCUT | नाशिकमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 'राज'बाण, पाहा संपूर्ण भाषण | एबीपी माझा
सिंचन घोटाळा झाला की नाही? हे सत्ताधाऱ्यांनी सांगावं, की भाजप-शिवसेनेने या घोटाळ्याचेळी राजकारण केलं का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
अमित शाह सांगलीत म्हणाले होते की ७२००० कोटींच्या घोटाळ्याचं काय झालं? तुम्ही सत्तेत होतात उत्तरं द्या? भाजप-शिवसेनेच्या सत्तेच्या काळात जलसिंचनाची नक्की काय कामं केली? हे कधी ते सांगणार आहेत?#RajThackeray
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) April 26, 2019
आधीच्या सरकारच्या काळात मीच तेंव्हाच्या सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत होते. त्यावेळी सिंचन घोटाळ्यातील भ्रष्टाचारावर भाजपचे नेते घसा फोडून ओरडत होते. पण सत्तेत आल्यावर देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावर आरोप होते ते सुनील तटकरे आणि अजित पवारांवर का नाही कारवाई झाली?#RajThackeray
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) April 26, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement