एक्स्प्लोर
विरोधकांचा नेता कोण, उद्धव ठाकरे यांचा सवाल
आमच्याविरोधात आघाडी करणाऱ्या विरोधकांचा नेता कोण आहे? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

गांधीगर : आमच्याविरोधात आघाडी करणाऱ्या विरोधकांचा नेता कोण आहे? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज गांधीनगर येथून लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीनंतर एक सभा झाली, या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. कधी काळी ज्यांचा उल्लेख अफजलखानाची स्वारी म्हणून केला होता, त्याच अमित शाहांचा अर्ज भरण्यासाठी आज उद्धव ठाकरे गुजरातच्या दौऱ्यावर गेले आहेत. गांधीनगरमधल्या अमित शाहांच्या रॅलीत सहभागी होऊन त्यांनी महायुतीला मतदान करण्याचे आवाहनही केले. विरोधकांप्रमाणे आमचे फक्त हात मिळालेले नाहीत, तर आमची मनंसुद्धा जुळली आहेत, असा दावा उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या गांधीनगरमध्ये येण्याने अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे. आमच्यात (शिवसेना आणि भाजप)मतभेद होते, पण आता आमची मनं जुळली आहेत," असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन गांधीनगरमधील मतदारांना केले आहे. उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण पाहा दरम्यान उद्धव ठाकरेंचा गुजरात दौरा म्हणजे अफजल खानाच्या मदतीसाठी उंदरांची कुमक निघाल्यासारखे आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
आणखी वाचा




















