एक्स्प्लोर

WB Exit Poll Result 2021 Time: बंगालमध्ये कोणाचे सरकार स्थापन होईल, संध्याकाळी 5 पासून एक्झिट पोल

West Bengal Exit Poll Result 2021 Date Time: 2 मे रोजी पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालाआधी सत्तेची गुरुकिल्ली कोणाकडे ठेवता येईल हे जाणून घ्या. आज सायंकाळी पाचपासून एबीपीच्या एक्झिट पोलमध्ये अचूक अंदाज जाणून घेण्यासाठी तयार रहा.

West Bengal Exit Poll Result 2021 Date Time: पश्चिम बंगालमध्ये सत्तेची अंतिम लढाई सुरू आहे. आज संध्याकाळी आठव्या टप्प्यातील मतदान संपताच बंगालची सत्ता कोण घेणार हे निश्चित होईल. सत्तारूढ तृणमूल काँग्रेस परत येईल की राज्यात खुर्ची मिळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी होईल. निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी येणार आहे. परंतु, एबीपी न्यूजवरील एक्झिट पोलच्या माध्यमातून तुम्हाला बंगालच्या मनात काय आहे? याचा अचूक अंदाज तुम्हाला कळू शकेल.

सायंकाळी पाच वाजल्यापासून पश्चिम बंगालच्या एक्झिट पोल
आज सायंकाळी पाच वाजल्यापासून एबीपी न्यूजवर पश्चिम बंगालचा एक्झिट पोल सर्वांना पाहायला मिळणार आहे. 2 मे रोजी येणाऱ्या निवडणुकांच्या निकालाआधी आपणास ठाऊक असेल की सत्तेच्या सिंहासनावर कोण बसणार आहे. सायंकाळी 5 वाजेपासून तुम्हाला मतदारांचा मूड जाणून घेता येईल.

पश्चिम बंगालमधील जागा
पश्चिम बंगालमध्ये 4 टप्प्यांत 294 विधानसभा जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या आणि आठव्या टप्प्यातील निवडणुका आज सुरू आहेत. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्च रोजी झाले आणि त्यानंतर एप्रिल 1, 6, 10, 17, 22 आणि 26 एप्रिल रोजी मतदान झाले.

पक्षांकडून प्रतिष्ठा पणाला
बंगालची लढाई जिंकण्यासाठी भाजप आणि टीएमसीने सर्व ताकद पणाला लावली आहे. देशात कोरोना विषाणूचा धोका असूनही बंगालमध्ये जाहीर सभा, रॅलींना उत आला होता. भाजपकडून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहापासून अनेक मातब्बर नेत्यांनी जोर लावला आहे. त्याचवेळी टीएमसी चीफ आणि बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांनीही पायाच्या दुखापतीनंतरही जोरदार प्रचार केला. निवडणुकांचे शेवटचे दोन टप्पे जवळ येताच कोविडच्या ढासळत्या स्थितीमुळे निवडणूक प्रचार ठप्प झाला. आता प्रत्येकजण 2 मे रोजी होणार्‍या निवडणुकीच्या निकालाची वाट पाहत आहे.

पश्चिम बंगाल निवडणूक 

  • या वेळी बंगालमध्ये टीएमसी प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारात 44 दिवस व्हीलचेअरवर प्रचार करत होत्या.
  • पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये सुमारे 20 जाहीर सभा घेतल्या आणि अमित शहा यांनी सुमारे 70 रॅली काढल्या.
  • टीएमसी उमेदवाराच्या समर्थनार्थ ममता बॅनर्जी यांनी सुमारे 150 जाहीर सभांना संबोधित केले.
  • ममता बॅनर्जी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी केंद्राला जबाबदार धरताना दिसल्या. म्हणून त्यांनी असेही आश्वासन दिले की टीएमसी सरकार आल्यास बंगालच्या लोकांना विनामूल्य लसीकरण केले जाईल.
  • राहुल-ममता नंतर पंतप्रधान मोदींनीही सर्व सभा रद्द केल्या आणि भाजपने सभेसाठी फक्त 500 लोकांची संख्या मर्यादित केली.

ममता यांच्या बाजूचे आणि विरोधातील मुद्दे

  • निवडणूक प्रचारादरम्यान ममता नंदीग्रामच्या लोकांसोबत भावनिक संबंध बनवण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
  • त्यांनी 2007 मध्ये झालेल्या आंदोलनाला शेतकरी आंदोलनाशी जोडलं.
  • पीरजादा अब्बासी यांच्या नेतृत्वाखालील इंडियन सेक्युलर फ्रंटने नंदीग्रामध्ये उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे मुसलमान मतं फुटण्याची भीती जास्त नाही.
  • तर, ममता यांनी हिंदू बहुल परिसरातील मंदिरांमध्ये जाऊन त्या हिंदूविरोधी नाहीत असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला आहे. पण, नोकरी आणि विकास यांसारखे मुद्दे ममता यांच्या विरोधात आहेत.

मुख्य उमेदवार कोण आहेत?
भाजपने आतापर्यंत पाच खासदारांना तिकिटे दिली आहेत.
केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो – टोलीगंज मतदारसंघ
हुगळीचे खासदार लॉकेट चॅटर्जी – चुंचुडा मतदारसंघ
कूचबिहारचे खासदार निसिथ प्रामणिक – दिनहाटा मतदारसंघ
राज्यसभेचे सदस्य स्वपन दासगुप्ता – तारकेश्वर मतदारसंघ
खासदार जगन्नाथ सरकार – रानाघाट मतदारसंघ

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसमोर त्यांचे एकेकाळचे सर्वात विश्वासू शुभेंदू अधिकारी यांचं आव्हान आहे. नंदीग्राममध्ये ही लढत झाली.

याशिवाय मुकुल रॉय (कृष्णानगर उत्तर), त्यांचे पुत्र शुभ्रांशु रॉय (बीजपुर) आणि राहुल सिन्हा (हाबडा) यांनाही भाजपने तिकिट दिले आहे.


भाजपचे 'स्टार' उमेदवार
अभिनेत्री पायल सरकार - बेहाला पूर्व मतदारसंघातून तिकिट
अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती - हावडा श्यामपूरमध्ये निवडणूक रिंगणात
अभिनेता यशदास गुप्ता - चंडीतलामधून विधानसभेचं तिकिट
अभिनेता हीरन चटर्जी - खडगपूरमध्ये भाजपचे उमेदवार
अभिनेत्री अंजना बसु

टीएमसीचे 'स्टार' उमेदवार
अभिनेत्री - कौशानी मुखर्जी - कृष्णानगर उत्तर मतदारसंघातून तिकिट
गायिका अदिति मुंशी - राजरहाट गोपालपूरमध्ये निवडणूक रिंगणात
अभिनेत्री लवली मित्रा - सोनारपूर दक्षिणमधून उमेदवारी
अभिनेत्री बीरबाहा हांसदा - झारग्रामधून निवडणूक रिंगणात
अभिनेत्री सयंतिका बनर्जी - आज त्यांना बांकुडामधून उमेदवारी जाहीर
अभिनेत्री साउनी घोष - त्यांना आसनसोल दक्षिणमधून तिकिट
अभिनेत्री जून मालिया - मेदिनीपूरमधून त्यांना उमेदवारी

 

कुठं कुठं पाहू शकता एक्सिट पोल

लाईव्ह टीव्ही: https://marathi.abplive.com/live-tv  

मराठी वेबसाइट: https://marathi.abplive.com/  

इंग्रजी वेबसाइट: https://news.abplive.com/  

 

YouTube

हिंदी यूट्यूब: https://www.youtube.com/channel/UCmphdqZNmqL72WJ2uyiNw5w  

इंग्रजी यूट्यूब: https://www.youtube.com/user/abpnewstv  

 मराठी युट्युब: https://youtube.com/c/abpmajhatv  

 

हिंदी फेसबुक अकाउंट: facebook.com/abpnews    

इंग्रजी फेसबुक अकाउंट: facebook.com/abplive    

मराठी फेसबुक अकाउंट: https://www.facebook.com/abpmajha  

 

ट्विटर हॅंडल: https://twitter.com/abpmajhatv?s=09  

इंस्टाग्राम: https://instagram.com/abpmajhatv?igshid=mddulihsde0q

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
Gokul Election : सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget