एक्स्प्लोर
आम्हाला मायावतींची गरज नाही, काँग्रेसचे बसपाला खरमरीत प्रत्युत्तर
बसपाच्या सुप्रिमो मायावती यांनी आम्ही काँग्रेससोबत युती करणार नसलल्याचे जाहीर केल्यानंतर काँग्रेसनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आम्हालाही मायावतींची गरज नाही, असं उत्तर काँग्रेसकडून देण्यात आले आहे.
![आम्हाला मायावतींची गरज नाही, काँग्रेसचे बसपाला खरमरीत प्रत्युत्तर We have no need to allience with Mayavati : Congress आम्हाला मायावतींची गरज नाही, काँग्रेसचे बसपाला खरमरीत प्रत्युत्तर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/02171253/Rahul-Gandhi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लखनौ : बसपाच्या सुप्रिमो मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेससोबत कोणत्याही राज्यात युती करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर काँग्रेसनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आम्हालाही मायावतींची गरज नाही, असं उत्तर काँग्रेसकडून देण्यात आले आहे.
काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील प्रवक्ते राजीव बक्षी म्हणाले की, "आम्हाला बहुजन समाज पार्टीसोबत युती करायची आहे की नाही, हे मायावतींनी ठरवू नये. ज्या मायावतींकडे एकही खासदार नाही त्यांच्याकडे युतीसाठी आम्ही का जाऊ? आम्ही स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढवू. आम्हाला मायावतींची गरज नाही."
राजीव बक्षी म्हणाले की, "आम्ही बसपाशी युती करण्याच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा केलेली नाही. उलट काँग्रेससोबत युती करण्यासाठी मायावतीच धडपडत आहेत. मायावती त्यामुळे अस्वस्थ झाल्या आहेत."
दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला एक मोठा फटका बसला आहे. काँग्रेस पक्षासोबत कोणत्याही राज्यात युती करणार नसल्याचे बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी आज जाहीर केले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशसह देशात अनेक ठिकाणी काँग्रेसला नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेस सरकारसोबत युती करण्याच्या निर्णयाबाबत मायावती म्हणाल्या की, "आम्ही उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत युती केली आहे. आमच्या दोन समविचारी पक्षांची ही युती उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी पुरेशी आहे."
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)