एक्स्प्लोर

गुरु-शिष्य आमने सामने, चंद्रपुरातल्या लढतीकडे राज्याचं लक्ष

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि त्यांचे शिष्य सदाभाऊ खोत यांच्यात रंगलेला कलगीतुरा संपूर्ण राज्याने अनुभवला आहे. अगदी तसाच अनुभव या विधानसभेत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

चंद्रपूर : शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि त्यांचे शिष्य सदाभाऊ खोत यांच्यात रंगलेला कलगीतुरा संपूर्ण राज्याने अनुभवला आहे. अगदी तसाच अनुभव या विधानसभेत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. या ठिकाणी ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप आणि त्यांचे शिष्य संजय धोटे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभे ठाकले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघ हा राज्यातील शेतकरी संघटनेच्या चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शेतकरी संघटना या भागात नुसती चळवळ करून थांबली नाही तर तब्बल तीन वेळा शेतकरी नेते वामनाराव चटप इथून आमदार झाले. वामनराव चटप या निवडणुकीत पुन्हा एकदा स्वतंत्र भारत पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. मात्र या वेळी त्यांना शेतकरी चळवळीतील त्यांच्याच एका शिष्याने आणि कधीकाळच्या सहकार्याने निवडणुकीत आव्हान दिले आहे. 2009 पर्यंत राजुरा मतदारसंघात आमदार असलेल्या चटप यांनी विधानसभेऐवजी लोकसभेत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचा संकल्प केला आणि त्यामुळे त्यांनी 2009 आणि 2014 ची लोकसभा लढवली. वामनराव या दोन्ही निवडणुकीत पराभूत झाले. पण त्यांनी विधानसभा लढवली नाही आणि शेतकरी संघटनेतील इतर कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी दिली. 2009 मध्ये अॅड. संजय धोटे स्वतंत्र भारत पक्षाकडून निवडणूक लढले आणि पराभूत झाले. पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2014 च्या मोदी लाटेत आमदार झाले. या वेळी भाजपने संजय धोटे यांना पुन्हा संधी दिली आहे, मात्र यावेळी त्यांना त्यांच्या गुरुचा राजकीय प्रतिस्पर्धी म्हणूनन सामना करावा लागतोय. एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या गुरु-शिष्याच्या या जोडीमुळे राजुरा मतदारसंघात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी चलबिचल निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे गुरु-शिष्याची ही लढाई आपल्या पथ्यावर पडेल, असा काँग्रेसला विश्वास आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वळवून संजय धोटे यांनी 2014 मध्ये भाजपला राजुरा मतदारसंघात विजय मिळवून दिला होता. मात्र आता प्रत्यक्ष वामनराव चटप मैदानात उतरल्यामुळे त्यांना कितपत यश मिळतं आणि गुरु-शिष्याच्या या लढाईत काँग्रेस बाजी मारणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12  डिसेंबर 2024 : ABP MajhaAtul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिलाABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Embed widget