एक्स्प्लोर
Advertisement
डहाणूतील माकपचे विनोद निकोले सर्वात गरीब आमदार!
आताच्या निवडणुका म्हटल्या की पैसा हा महत्त्वाचा फॅक्टर समजला जातो. मात्र याच फॅक्टरला अपवाद ठरला आहे तो डहाणू विधानसभेत महाआघाडीकडून निवडणूक लढलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद भिवा निकोले हा तरुण चेहरा!
पालघर : आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. राज्यातील बहुतांश उमेदवारांची खासगी मालमत्ता कोट्यवधींच्या घरात असली तरी त्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार विनोद भिवा निकोले हे अपवाद आहेत. मालमत्तेच्या बाबतीत ते सर्वांत गरीब आमदार आहेत. त्यांच्याकडे 51 हजार 82 रुपयांची रोकड असून, त्यांना राहण्यासाठी स्वतःच्या मालकीचं घर नाही. त्यांचे मूळगाव डहाणू तालुक्यातील उर्से हे खेडेगाव असून अतिशय गरीब कुटुंबात निकोले जन्माला आले. आई-वडिलांनी मोलमजुरी करुन विनोदला शिकवले, त्यांचं चौथीपर्यंतचं शिक्षण आशागड इथे झालं. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण कोसबाड आणि डहाणू इथे घेतलं. मात्र पूर्वीपासून गरिबीत दिवस काढल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेताना सामाजिक बंधीलकी जपत त्यांनी काम सुरुच ठेवलं होतं.
महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या डहाणू विधानसभा मतदारसंघातून माकपचे विनोद निकोले यांनी भाजपच्या पास्कल धनारे यांचा चार हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. निकोले यांनी केवळ पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही हे दाखवून दिले. मतदारासंघातील जनहिताच्या प्रश्नावरील संघर्ष आणि प्रामाणिक भूमिका आणि आचरण असले तर नागरिक डोक्यावर घेतात, असं माकप कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे.
चरितार्थ चालवण्यासाठी निकोले हे डहाणूच्या इराणी रोडवरील वैभव कॉम्प्लेक्सच्या आवारात टपरी टाकून वडापाव आणि चहाविक्री करत, एसवायबीएपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या निकोले यांना समाजकार्याची प्रथमपासून आवड होती. त्यांच्या टपरीवर चहा-नाश्त्यासाठी माकपचे बुजूर्ग कॉम्रेड एल बी धनगर यायचे. त्यांनी निकोले माकपचे सदस्य करुन घेतलं होतं. 2003 मध्ये सदस्यत्व घेतलेले निकोले हे माकपचे 2006 पासून पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. दरमहा 500 रुपये मानधनावर त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्टचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केलं.
आदिवासींवरील अन्याय आणि अत्याचाराविरोधात लढणाऱ्या निकोलेंना ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद अथवा जिल्हा परिषद सदस्यत्त्वाचा कुठलाही अनुभव नसताना, त्यांनी भाजपचे मातब्बर उमेदवार धनारे यांचा पराभव करुन थेट विधानसभा गाठली, असं माकपचे नेते अशोक ढवळे यांनी सांगितले. विधानसभेतील सर्वांत गरीब आमदार राज्यातील नागरिकांचे गाऱ्हाणे विधिमंडळात ताकदीने मांडील, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्राईम
बातम्या
Advertisement