Vidhansabha Election : सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील 24 शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल
Vidhansabha Election ,छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील 24 शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Maharashtra Vidhansabha Election ,छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड - सोयगाव तालुक्यांतील 24 शाळांतील मुख्याध्यापकांनी विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने संबंधित शाळेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षणधिकारी कार्यालय यांच्याकडून वारंवार लेखी, तोंडी आदेश देऊनही शिक्षकांची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर न भरल्याने 24 शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात 8, ग्रामीण पोलीस ठाण्यात 9, अजिंठा पोलीस ठाण्यात 5 आणि फर्दापूर पोलीस ठाण्यात 2 अशा एकूण 24 मुख्याध्यापकांविरुद्ध दुपारी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील बहुतांश शाळा या अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या आहेत.
सिल्लोड शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात अनिल बन्सी पवार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांच्या तक्रारीवरून सिल्लोड शहरातील अब्दुल रहीम उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख नईम, नॅशनल मराठी शाळेचे शेख गफ्फार कादर, सिल्लोड येथील नॅशनल मराठी शाळेचे गजानन निकम, अब्दालशानगर येथील नॅशनल उर्दूचे सोहेब अहेमद खान, जाकीर हुसेननगरचे नॅशनल उर्दू शाळेचे अब्दुल वाहिद खान, जयभवानीनगरमधील नॅशनल मराठीचे राजू काकडे, संत एकनाथचे दिनेश गोंगे, जमालशा कॉलनीतील नॅशनल उर्दूचे शेख राजीक अब्दुल निसार अशा सिल्लोड शहरातील आठ मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
ग्रामीण पोलीस ठाण्यात अंधारी येथील नॅशनल मराठीचे हकिमखान पठाण, अंधारी येथील हिंदुस्थान उर्दूचे काजी इकमोद्दीन, डोंगरगाव येथील प्रगती उर्दू शाळेचे शेख सर्फराज, डोंगरगाव येथील प्रगती मराठी शाळेचे मुख्याध्यापक प्रताप बदर, केर्हाळा येथील नॅशनल उर्दूचे मुख्याध्यापक नाव माहित नाही. अंधारी येथील हिंदुस्थान उर्दूचे मोहंमद खलील शेख, घाटनांद्रा येथील नॅशनल मराठीचे संदीप विठ्ठल सपकाळ, डोंगरगाव येथील नॅशनल मराठीचे विजय वाघ, घाटनांद्रा नॅशनल उर्दूचे मुख्याध्यापक नाव माहीत नाही, अशा 9 शाळांच्या मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
शिवना येथील नॅशनल उर्दू प्रा. शाळा, नॅशनल उर्दू हायस्कूल अजिंठा, उर्दू हायस्कूल अंभई, रनेश्वर विद्यालय हट्टी, नॅशनल मराठी विद्यालय पिंपळदरी येथील पाच मुख्याध्यापकांविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम 1991 चे कलम 134अन्वये गटशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोयगाव तालुक्यातील नॅशनल मराठी शाळा सावळदबारा आणि माणिकराव पालोदकर विद्यालय फरदापुर या दोन शाळांच्या मुख्याध्यापकांवर फरदापुर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वरळीत सर्वात आक्रमक भाषण, पुतण्या आदित्य ठाकरेंवर काय बोलले?