Vidhan Parishad Election: चुरस वाढली! भाजपचा सहावा उमेदवार घोषित, विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात
Vidhan Parishad Elections : विधान परिषद निवडणुकीत तीव्र चुरस निर्माण झाली आहे. कारण भाजपनं आपल्या सहाव्या उमेदवाराची घोषणा केली आहे.आता विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.
Vidhan Parishad Elections : विधान परिषद निवडणुकीत तीव्र चुरस निर्माण झाली आहे. कारण भाजपनं आपल्या सहाव्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपकडून सहावे उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत हे आज अर्ज दाखल करणार आहेत. भाजपकडून सहाव्या जागेसाठी आज सकाळी 11 वाजता सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज भरला जाईल. त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर येथे जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांचा करोना रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहे. तोपर्यंत रिपोर्ट निगेटिव्ह आला तर ते सागर बंगल्यावर जातील अन्यथा ऑनलाईन बैठक होण्याची शक्यता आहे.
आता विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. यात महाविकास आघाडीचे सहा (शिवसेना 2, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी 2) भाजपचे सहा उमेदवार आहेत. राष्ट्रवादीकडून (NCP) विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Candidate) रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गर्जे तिसरा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.
खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी
एकनाथ खडसे यांचे नाव विधान परिषदेसाठी घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. जळगाव जिल्ह्यातून कार्यकर्ते खडसेंच्या निवासस्थानी दाखल होत आहेत. एकनाथ खडसेंनी म्हटलं की, मला उमेदवारी दिल्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे. शरद पवार यांचा विश्वास मी सार्थ करुन दाखवेन. भाजपनं अडगळीत टाकल्यानंतर राष्ट्रवादीनं हात दिला, असं खडसे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी श्री. रामराजे नाईक निंबाळकर आणि श्री. एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे. @NCPspeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 9, 2022
शिवसेना (Vidhan Parishad Shiv Sena Candidate)
सचिन अहिर (Sachin Ahir)
आमश्या पाडवी (Aamshya Padvi)
काँग्रेस (Vidhan Parishad Congress Candidate)
भाई जगताप (Bhai Jagtap)
चंद्रकांत हंडोरे (Chandrant Handore)
भाजप (Vidhan Parishad BJP Candidate)
प्रवीण दरेकर (Pravin Darekar)
उमा खापरे (Uma Khapre)
श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiy)
राम शिंदे (Ram Shinde)
प्रसाद लाड (Prasad Lad)
सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)
राष्ट्रवादी (NCP Vidhan Parishad Candidate)
एकनाथ खडसे (Eknath Khadse)
रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)
राष्ट्रवादीच्या जेलमध्ये असलेल्या सदस्यांच्या दोन मतांचं काय होणार?
राज्यसभा निवडणुकीत एकेक मत महत्त्वाचं असताना राष्ट्रवादीच्या जेलमध्ये असलेल्या सदस्यांच्या दोन मतांचं काय होणार याचा फैसला आज न्यायालयात होणार आहे. माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी मतदानासाठी जामीन मिळावा म्हणून अर्ज केलाय. त्याला ईडीनं विरोध केलाय. कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही असा दावा ईडीनं कोर्टात केलाय. त्याला देशमुख आणि मलिकांचे वकील आज उत्तर देणार असून न्यायालयात त्यावर आज निर्णय अपेक्षित आहे.