![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rajya Sabha Election 2022 Live : राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी; पाहा प्रत्येक अपडेट्स
Rajya Sabha Election Maharashtra Vidhan Parishad Elections : राज्यसभा निवडणूक आणि विधानपरिषद निवडणुकीवरुन सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. याविषयीच्या महत्वाच्या अपडेट्स...
LIVE
![Rajya Sabha Election 2022 Live : राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी; पाहा प्रत्येक अपडेट्स Rajya Sabha Election 2022 Live : राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी; पाहा प्रत्येक अपडेट्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/a37caf5a7dc5c710e3d25234fa664e65_original.jpg)
Background
Rajya Sabha Election 2022 Live Update Maharashtra Politics news Vidhan Parishad Elections : राज्यात राज्यसभा निवडणुकीचा धुरळा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) उत्कंठता वाढली असून 10 जून म्हणजेच, आज राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राज्यातील सहा जागांसाठी मतदान पार पडले. सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एक एक मत महत्त्वाचं आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस व्होटिंगची किंवा मतं फुटण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांना आहे. त्यामुळे शिवसेनेने (Shiv Sena) आमदारांना व्हिप जारी केला आहे. प्रत्येक पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे. त्यामुळेच काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना आणि भाजपनं (BJP) आपापल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवलं आहे.
आज राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 पासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. विधानसभेचे 288 सदस्य आहेत. परंतु एका आमदाराचे निधन आणि 2 आमदार कोठडीत असल्याने एकूण 285 मतदार राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान करणार आहेत.
सहा जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्याने घोडेबाजार अटळ
विद्यमान संख्याबळानुसार राज्यात भाजपचे दोन आणि महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र तिन्ही पक्षातील उर्वरित मतांच्या जोरावर शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे, तर भाजपनेही उर्वरित मतांच्या आणि अपक्षांच्या मतांवर दावा करत कोल्हापूरच्याच धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आणि घटक पक्षांची भूमिका महत्वाची राहणार आहे.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. येत्या 10 जूनला म्हणजेच, आज होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह महाविकास आघाडीला आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून रहावं लागणार आहे. त्यातच महाविकास आघाडीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तर नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या कारागृहात आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीत त्यांना मतदान करता यावं यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील होती. त्यामुळे आपल्याला मतदान करता यावं यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी न्यायालयात अर्ज केला होता. आता त्यांना मतदान करता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.
कशी होणार निवडणूक?
- राज्यसभेसाठी 10 जूनला सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
- 4 वाजेनंतर मतदान मोजायला सुरुवात होईल.
- विधानभवनाच्या सेंट्रल हाॅलमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल
- मतदान करणार त्या ठिकाणी बुथ कंपार्टमेंट सहा फुटांचा असणार
- मतदान करताना सदस्यांना मोबाईल बाहेर ठेवून आतमध्ये जाता येणार
- प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी आतमध्ये असणार
राज्यसभा निवडणुकीसाठी विजयी उमेदवाराचा कोटा बदलला
राज्यसभेतील (Rajya Sabha Election 2022) विजयी उमेदवारांचा कोटा आता कमी करण्यात आला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाला परवानगी नाकारल्यानंतर आता विजयी उमेदवाराचा कोटा 40.71 इतका झाला आहे. या आधी तो 41.14 इतका होता. या आधी निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज असायची. आता विजयी उमेदवाराचा कोटा बदलल्याने त्यासाठी 41 मतांची गरज आहे.
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर हा कोटा बदलण्यात आला आहे. समाजवादी पक्ष, एमआयएम सारखे लहान पक्ष आता महाविकास आघाडीकडे झुकले असल्याने महाविकास आघाडीसाठी हा बदललेला कोटा फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं आहे.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारली
राज्यातल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवारी) मतदान होणार असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करत या दोघांनी कोर्टात अर्ज केला होता. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही कोठडीत आहेत.
अनिल देशमुखांची उच्च न्यायालयात धाव
निवडणुकीच्या मतदानासाठी परवानगी नाकारल्यानंतर अनिल देशमुखांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सकाळी तातडीने सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना आज होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी आशा कायम आहेत.
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी विजयी उमेदवाराचा कोटा बदलला
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेतील (Rajya Sabha Election 2022) विजयी उमेदवारांचा कोटा आता कमी करण्यात आला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाला परवानगी नाकारल्यानंतर आता विजयी उमेदवाराचा कोटा 40.71 इतका झाला आहे. या आधी तो 41.14 इतका होता. या आधी निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज असायची. आता विजयी उमेदवाराचा कोटा बदलल्याने त्यासाठी 41 मतांची गरज आहे.
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर हा कोटा बदलण्यात आला आहे. समाजवादी पक्ष, एमआयएम सारखे लहान पक्ष आता महाविकास आघाडीकडे झुकले असल्याने महाविकास आघाडीसाठी हा बदललेला कोटा फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं आहे.
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणूक कशी होणार?
- राज्यसभेसाठी 10 जूनला सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
- 4 वाजेनंतर मतदान मोजायला सुरुवात होईल.
- विधानभवनाच्या सेंट्रल हाॅलमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल
- मतदान करणार त्या ठिकाणी बुथ कंपार्टमेंट सहा फुटांचा असणार
- मतदान करताना सदस्यांना मोबाईल बाहेर ठेवून आतमध्ये जाता येणार
- प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी आतमध्ये असणार
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान
Rajya Sabha Election 2022 : आज राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 पासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. विधानसभेचे 288 सदस्य आहेत. परंतु एका आमदाराचे निधन आणि 2 आमदार कोठडीत असल्याने एकूण 285 मतदार राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान करणार आहेत.
Rajya Sabha Election 2022 : राज्यात राज्यसभा निवडणुकीचा धुरळा, आज मतदान
Rajya Sabha Election 2022 : राज्यात राज्यसभा निवडणुकीचा धुरळा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या उत्कंठता वाढली असून 10 जून म्हणजेच, आज राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राज्यातील सहा जागांसाठी मतदान पार पडले. सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एक एक मत महत्त्वाचं आहे.
Rajya Sabha Election Update : मतदानाची परवानगी नाकारली, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना राज्यसभेकरता मतदानाची परवानगी नाही
Rajya Sabha Election Update : मतदानाची परवानगी नाकारली, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना राज्यसभेकरता मतदानाची परवानगी नाही
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)