एक्स्प्लोर

भाजप माघार घेणार? की, 'मविआ'चे नेते फडणवीसांना भेटणार? विधानपरिषद उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी आज अखेरचा दिवस

Vidhan Parishad Elections 2022 : विधानपरिषद उमेदवार अर्ज माघारीसाठी आज अखेरचा दिवस. राज्यसभेनंतर विधानपरिषदेतही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना होणार?

Vidhan Parishad Elections 2022 : राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (BJP) असा सामना रंगण्याची शक्यता आहे. विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणूक 20 जूनला होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे. राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी असे प्रयत्न सुरु आहेत. मात्र राज्यसभा निवडणुकीत अविश्वासाचं वातावरण निर्माण झाल्यानं कुणीच माघार घेण्यास तयार नसल्याचं चित्र आहे. विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी भाजपचे पाच, शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP), काँग्रेसचे (Congress) प्रत्येकी दोन तर एक भाजपपुरस्कृत अपक्ष असे 12 उमेदवार रिंगणात आहेत. आता या निवडणुकीत भाजप माघार घेणार का? निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते फडणवीस यांची भेट घेणार का? याकडं लक्ष लागलं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत काही तोडगा निघाला नाही तर ही निवडणूकही राज्यसभेप्रमाणे चुरशीची होण्याची चिन्हं आहेत.

भाजपकडून सहाव्या उमेदवाराची घोषणा 

विधान परिषद निवडणुकीत तीव्र चुरस निर्माण झाली आहे. कारण भाजपनं आपल्या सहाव्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपकडून सहावे उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत यांनी अर्ज दाखल केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आता विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. यात महाविकास आघाडीचे सहा (शिवसेना 2, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी 2) भाजपचे सहा उमेदवार आहेत. राष्ट्रवादीकडून (NCP) विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Candidate) रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गर्जे तिसरा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. 

विधान परिषदेसाठी रिंगणात उतरलेले उमेदवार 

शिवसेना (Vidhan Parishad Shiv Sena Candidate)
सचिन अहिर (Sachin Ahir)
आमश्या पाडवी (Aamshya Padvi)

राष्ट्रवादी (NCP Vidhan Parishad Candidate)
एकनाथ खडसे (Eknath Khadse)
रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)

काँग्रेस (Vidhan Parishad Congress Candidate)
भाई जगताप (Bhai Jagtap)
चंद्रकांत हंडोरे (Chandrant Handore)

भाजप (Vidhan Parishad BJP Candidate)
प्रवीण दरेकर (Pravin Darekar)
उमा खापरे (Uma Khapre)
श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiy)
राम शिंदे (Ram Shinde)
प्रसाद लाड (Prasad Lad)
सदाभाऊ खोत  (Sadabhau Khot)

राष्ट्रवादीच्या जेलमध्ये असलेल्या सदस्यांच्या दोन मतांचं काय होणार?

राज्यसभा निवडणुकीत एकेक मत महत्त्वाचं असताना राष्ट्रवादीच्या जेलमध्ये असलेल्या सदस्यांच्या दोन मतांचं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच मुंबई सत्र न्यायालया पाठोपाठ उच्च न्यायालयाकडूनही नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी तरी यांना परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget