(Source: Poll of Polls)
Vidhan Parishad Election : सदाभाऊ खोत भाजपचे सहावे उमेदवार, BJP समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून विधानपरिषदेसाठी भरला अर्ज
Vidhan Parishad Election : भाजपनं विधान परिषद निवडणुकीत चांगलीच रंगत आणलीय. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सहाव्या जागेसाठी भाजप समर्थित उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत आता कमालीची चुरस निर्माण झाली आहे. भाजपनं या निवडणुकीत चांगलीच रंगत आणलीय. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सहाव्या जागेसाठी भाजप समर्थित उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. भाजपमधील चर्चित नावांना मागे सारत सदाभाऊंनी अर्ज दाखल केला. चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊंच्या नावाची घोषणा सहावे उमेदवार म्हणून केली आहे. विधान परिषदेसाठी आता 10 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात आहेत. यात महाविकास आघाडीकडून सहा तर भाजपकडून सहा उमेदवार आता रणांगणात आहेत.
महाविकास आघाडीचे सहा (शिवसेना 2, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी 2) भाजपचे सहा उमेदवार आहेत. राष्ट्रवादीकडून (NCP) विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Candidate) रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गर्जे तिसरा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसकडून मुंबईकर भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे मैदानात आहेत.
विधान परिषदेच्या आखाड्यात असलेले उमेदवार
शिवसेना (Vidhan Parishad Shiv Sena Candidate)
सचिन अहिर (Sachin Ahir)
आमश्या पाडवी (Aamshya Padvi)
काँग्रेस (Vidhan Parishad Congress Candidate)
भाई जगताप (Bhai Jagtap)
चंद्रकांत हंडोरे (Chandrant Handore)
भाजप (Vidhan Parishad BJP Candidate)
प्रवीण दरेकर (Pravin Darekar)
उमा खापरे (Uma Khapre)
श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiy)
राम शिंदे (Ram Shinde)
प्रसाद लाड (Prasad Lad)
सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)
राष्ट्रवादी (NCP Vidhan Parishad Candidate)
एकनाथ खडसे (Eknath Khadse)
रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)
इतर संबंधित बातम्या
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब
Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त, बैठकींना प्रत्यक्ष उपस्थित राहणार