एक्स्प्लोर
Advertisement
Vasai Vidhan Sabha : वसई विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या स्नेहा दुबे विजयी! हितेंद्र ठाकूरांना मोठा धक्का, जनतेनं भाकरी फिरवली
Vasai Vidhan Sabha Election 2024 : वसईमध्ये भाजपच्या उमेदवार स्नेहा दुबे आणि काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील यांच्यात 'काँटे की टक्कर' आहे.
Vasai Vidhan Sabha Constituency Election 2024 : वसई विधानसभा मतदारसंघात यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप लढत पाहायला मिळाली. वसई विधानसभेत भाजपच्या स्नेहा दुबे विजयी झाल्या आहे. वसईमध्ये बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर, महायुतीकडून भाजपच्या उमेदवार स्नेहा दुबे आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील यांच्यात 'काँटे की टक्कर' झाली. काँग्रेसचा तीव्र विरोध करणारी शिवसेना आता दोन गटांत विभागली आहे, त्यामुळे यातील एक गट भाजपसोबत आणि दुसरा गट काँग्रेससोबत असल्याचं चित्र या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही विभागला गेल्याने हा मतदारवर्गही विभागला आहे. ही परिस्थितीत हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी सुगीची मानली जात होती. पण, या निवडणुकीत मतदारराजाने भाकरी फिरवत हितेंद्र ठाकूर यांना पराभवाचा मोठा धक्का दिला.
वसई विधानसभा मतदारसंघ
पालघर जिल्ह्यातील वसई विधानसभा मतदारसंघ हा एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी वसई हा एक मतदारसंघ आहे. वसई ऐतिहासिक दृष्ट्या मुंबई उपनगराचा भाग होता. मात्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर वसई हा पालघर लोकसभा मतदारसंघाचा भाग बनला. मुंबई जवळचं वसई हे महत्त्वाचं औद्योगिक क्षेत्र बनलं असून इथे शहरी तसेच ग्रामीण दोन्ही प्रकारची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे.
राजकीय पार्श्वभूमी
वसई विधानसभा निवडणुकीत 1978 मध्ये पंढरीनाथ चौधरी यांनी जनता पक्षाच्या तिकीटावर विजय मिळवला. 1980 मध्ये काँग्रेसच्या ताराबाई वर्तक विधानसभेवर निवडून आल्या. 1985 मध्ये जनता पक्षाचे डोमिनिक गोंसाल्विस यांनी विजय मिळवला. 1990 पासून वसई मतदारसंघावर हितेंद्र ठाकूर यांचा दबदबा पाहायला मिळाला. हितेंद्र ठाकूर यांनी 1990 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. त्यानंतर 1995, 1999 आणि 2004 मध्ये स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक जिंकून वसईत आपला प्रभाव निर्माण केला. ठाकूर कुटुंबाने आपल्या दृढ नेतृत्त्वातून वसईच्या राजकारणात नवीन समीकरण तयार केले आणि त्यांना स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचं महत्त्व समजलं.
बहुजन विकास आघाडीची सुरूवात
2009 मध्ये स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आलेले विवेक पंडित हे वसईमध्ये बहुजन विकास आघाडीच्या उदयाचं प्रतीक ठरलं. यानंतर 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि वसई विधानसभा मतदारसंघावर आपला दबदबा कायम ठेवला. ठाकूर कुटुंबाने वसईच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले आणि बीवीएचा प्रचार स्थानिक समस्यांवर आधारित राहिला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
वसई विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी 102950 मते मिळवून विजय मिळवला. तर, शिवसेनेचे विजय गोविंद पाटील यांना 76955 मते मिळाली होती. ठाकूर यांच्या विजयामागे त्यांच्या त्यांची लोकप्रियता आणि स्थानिक मुद्द्यांवरील लक्ष ही कारणे आहेत.
वसई विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
- स्नेहा दुबे (भाजप) - विजयी
- विजय गोविंद पाटील (काँग्रेस)
- हितेंद्र ठाकूर (बहुजन वंचित आघाडी)
वसई विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल
- हितेंद्र ठाकूर (बहुजन वंचित आघाडी) - 102950 मते (विजयी)
- विजय पाटील (शिवसेना) - 76955 मते
- प्रफुल्ल ठाकूर (मनसे) - 3540 मते
वसई विधानसभा निवडणूक 2014 चा निकाल
- हितेंद्र ठाकूर (बहुजन वंचित आघाडी) - 97291 मते (विजयी)
- विवेक रघुनाथ पंडित (काँग्रेस) - 65395 मते
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement