(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vandre East Vidhan Sabha Election Result 2024: मातोश्रीचं मैदान ठाकरेंनी मारलं; वरुण सरदेसाईंचा मोठा विजय, झिशान सिद्दीकींचा 11 हजार मतांनी पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघापौकी महायुतीला 23, महाविकास आघाडीला 12, तर इतर 1 जागा मिळाली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभेच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024) महायुतील घवघवीत यश मिळाल्याचे दिसून येत आहे. महायुतीला 288 जागांपैकी 235 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. यामध्ये भाजप 137, शिवसेना शिंदे गट 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 50 जागा मिळाल्या आहे. यामध्ये काँग्रेसला 20, ठाकरे गटाला 16 आणि शरद पवार गटाला 14 जागा मिळाल्या.
मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघापौकी महायुतीला 23, महाविकास आघाडीला 12, तर इतर 1 जागा मिळाली आहे. मुंबईतील हाय व्होल्टेज लढत असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई यांनी बाजी मारली आहे. वरुण सरदेसाई यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे झिशान सिद्दीकी यांचा पराभव केला.
वरुण सरदेसाई यांचा 11 हजार 365 मतांनी विजय-
वरुण सरदेसाई यांचा 11 हजार 365 मतांनी विजय झाला आहे. वरुण सरदेसाईंना एकूण 57 हजार 708 मते मिळाली आहेत. तर झिशान सिद्दीकी यांना 46 हजार 343 मते मिळाली. मनसेच्या तृप्ती सावंत यांना 16 हजार 074 मते मिळाली.
कोण आहे वरुण सरदेसाई?
वरुण सरदेसाई ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे पुत्र आहेत. म्हणजेच ते आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. वरुण सरदेसाई यांच्यामुळे अनेकदा वादही निर्माण झाला आहे. वरुण सरदेसाई यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे. वरुण सरदेसाई गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जात होती.
राज्यात महायुतील मोठं यश-
महायुतीला 288 जागांपैकी 232 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. यामध्ये भाजप 135, शिवसेना शिंदे गट 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. राज्यभरात एकनाथ शिंदेंनी 81 जागा लढल्या. यामधून 57 जागांवर एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांचा विजय झाला.
लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली : अजित पवार
कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले, घटकपक्षांचे सहकारी राबले. सर्वजण आपली निवडणूक आहे असं समजून कामाला लागले. आमच्या योजनांबाबत टीका टिप्पणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपयश आलं. महाराष्ट्रात अपयश आलं होतं, ते अपयश आम्ही मान्य केलं. त्याच्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर करताना अनेक योजना मांडल्या, त्या लोकप्रिय झाल्या. लाडकी बहीण योजना गेमचेंजर झाली. अंडरकरंट असा बहिणींनी दाखवला की सगळे उताणे पडले, आडवे पडले, हे माझं स्पष्ट मत आहे, असं अजित पवार म्हणाले