एक्स्प्लोर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यातील नेत्यांशी संवाद साधणार, सत्तास्थापनेपूर्वी भाजपच्या गोटात हालचालींना वेग  

Amit Shah : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आता महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर महायुती विनासायास सत्तास्थापन करेल, असा अंदाज होता. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रात सुरु झालेल्या राजकीय नाट्यामुळे महायुतीचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. आता महायुतीचा शपथविधी 5 डिसेंबरला होईल, असे सांगितले जात असले तरी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नाराजी आणि मौन पाहता 5 डिसेंबरला तरी महायुतीचा शपथविधी (Mahayuti Oath Taking Ceremony) पार पडेल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. 

या सगळ्यामुळे महायुती विशेषत: भाजपच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने चक्र फिरवली जात असल्याचे दिसून येत आहे. अशातच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आता महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची ऑनलाईन बैठक घेतली. त्यामध्ये, भाजपच्या आमदारांनी सरकार स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर काय-काय काळजी घ्यायची यासंदर्भात या बैठकीत मार्गदर्शन करम्यात आलं आहे. महायुतीतील सर्वच मित्र पक्षांच्या गटनेत्यांची निवड झाल्यानंतर आता भाजपचा गटनेता कधी निवडला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे, भाजपचा गटनेता म्हणून कुणाची निवड होईल याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली ऑनलाईन बैठक

तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत. भाजपच्या सर्व आमदारांची बैठक 2 किंवा 3 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. तर 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याच्या सूचनाही आमदारांना देण्यात येणार आहे. त्यासोबतच महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जल्लोष करण्याचे देखील बावनकुळे यांनी सांगितल्याची माहिती आहे. त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पासेस देण्यात आलेल्या व्यक्तींनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाईल असेही ठरल्याचं कळतंय.

मुख्यमंत्री पदाचा चेहरा २ डिसेंबरला स्पष्ट होणार?

दरम्यान, मुख्यमंत्री पदाचा चेहरा २ डिसेंबरला स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपचा गटनेता ही 2 डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी 1 वाजता विधान भवनात गटनेता निवडीसाठी बैठक होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार   उपस्थित राहणार आहे.

राज तिलक की करो तयारी, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरची चर्चा 

राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लावले या बॅनर वर देवेंद्र फडणवीस हे शपथ घेत असतानाचा फोटो लावण्यात आलाय याच बॅनर वर राज तिलक की करो तयारी असा मजकूर सुद्धा या बॅनर वर टाकण्यात आले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख यांनी बॅनर लावले

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Annamalai : तमिळनाडूत भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नामलाईंनी स्वत:ला चाबकाचे फटके का मारले?Special Report Chhatrapati Sambhajinagar : कमांडो भरतीची बोगस जाहिरात, तरुणांची फसवणूकSpecial Report Aditi tatkare On Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेमुळे शिक्षकांचे पगार उशीराने?Special Report : Suresh Dhas यांचे आरोप ,महायुतीमध्ये Dhananjay Munde एकाकी पडलेत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Rohit Sharma : तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Mutual Fund SIP : 15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
Embed widget