एक्स्प्लोर

Raigad Guardian Minister : अदिती तटकरेच रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री; अनिकेत तटकरेंचं वक्तव्य; राष्ट्रवादी-शिवसेनेत पुन्हा तू-तू,मैं-मैं?

Raigad Guardian Minister : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

Raigad Guardian Minister : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) तर रायगडसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिणामी, केवळ 24 तासांत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदांसंदर्भातील निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला. सध्या महायुतीमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. आता रायगडच्या पालकमंत्रिपदावरून मंत्री अदिती तटकरे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली आहे. तर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा दावा केला.

अदिती तटकरेच रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री : अनिकेत तटकरे  

अदिती तटकरे या रायगडच्या जनतेच्या मनातील पालकमंत्री आहेत, असा दावा विधानपरिषदेचे माजी आमदार आणि सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी केला आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आग्रही असल्याचे या विधानावरून दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेत पुन्हा तू तू-मै मै होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नेमकं काय म्हणाल्या अदिती तटकरे? 

रायगड जिल्ह्याला राजकीय गैरसमजातून पालकमंत्रिपद मिळालेलं नाही. त्यामुळे जिल्हा नियोजनाची बैठक होत नसल्याने निधीचा अभावी राहाव लागत असल्याची खदखद महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली. रोहा येथे अजितदादांच्या राष्ट्रवादीची कार्यकारिणी आढावा सभा झाली, या सभेत त्या बोलत होत्या. शिवाय पालकमंत्री नसल्यामुळे इतर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतींना विकासात्मक दृष्ट्या तरी वंचित ठेऊ नका, अशी विनंती देखील अदिती तटकरे यांनी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना केली. राज्याचे तिन्ही नेतृत्व हे रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत जेव्हा योग्य निर्णय घ्यायचा तेव्हा घेतील. परंतु, रायगड जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेऊ नका, असेही त्यांनी म्हटले. यावेळी आदिती तटकरे यांच्या भाषणातून पालकमंत्रिपदाची उत्कंठा जाणवून आली. 

भरत गोगावले पालकमंत्री होणे हा आमचा अधिकार : महेंद्र दळवी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी वक्तव्य केले होते. मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होणे, हा आपला अधिकार आहे, असा आग्रह महेंद्र दळवी यांनी अलिबागमधील शिवसेनेच्या आढावा बैठकीत केला होता. पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांनी अनेक वेळा त्याग केलाय. मागचे सरकार बनवण्यात भरत गोगावले यांचा हातखंडा असताना सुद्धा त्यांना मंत्रीपद मिळू शकले नाही. सुनील तटकरे यांची नियत ही आपल्याच पदरात पाडून घेण्याची आहे. मात्र, त्यांचा या वृत्तीला आता छेद करण्याचं काम आपल्याच माध्यमातून करू, असा इशारा महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांना दिला होता.

आणखी वाचा 

Mahayuti : राज्यात महायुती परंतु रायगडमध्ये अपवाद, भरत गोगावलेंची भूमिका, महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना महत्त्वाचा सल्ला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Mahangarpalika Election 2026: पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत

व्हिडीओ

Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Mahangarpalika Election 2026: पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
Donald Trump on India: अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Embed widget