भाजपला महापौरपदासाठी पाठिंबा देऊन आपण काय पाप करतोय याचा शिंदेंनी विचार करावा : उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने मोठा ट्विस्ट
मुंबईकराकडून जास्त अपेक्षा होती. भरघोस आशीर्वाद देतील असा वाटलं होतं. मोठा आशीर्वाद दिला नसला तरी जे आशीर्वाद दिले ते ठीक असल्याचे वक्तव्य ठारे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं.
Uddhav Thackeray : मुंबईकराकडून जास्त अपेक्षा होती. भरघोस आशीर्वाद देतील असा वाटलं होतं. मोठा आशीर्वाद दिला नसला तरी जे आशीर्वाद दिले ते ठीक असल्याचे वक्तव्य ठारे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. महानगरपालिकेच्या निकालानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली. अति तिथे माती असेत. 2029 ची वाट पाहावी लागणार नाही याआधी त्यांची माती होईल अशी टीका देखील ठाकरेंनी भाजपवर केली. बाळासाहेबांनी भाजपला दोन घास भरवले नसते तर भाजपचा कुपोषणाने कधीच बळी गेला असता असा टोला देखील ठाकरेंनी लगावला. ज्यांची मदत घेऊन महापौर बसवत आहे त्यांना लाज वाटली पाहिजे. गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे आपण काय पाप करतोय अशी टीका देखील ठाकरेंनी केली.
मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन न करण्याऐवढा मी कत्रूड नाही
मुंबई महापालिकेमध्ये आमचे लोक प्रतिनिधी जातील. यांनी तिजोरी कशी खाली केली, याचा भांडभोड आमचे प्रतिनिधी करतील असे ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन न करण्याऐवढा मी कत्रूड नाही. पण त्यांनी कर्म कांड केल्यानंतरही आम्ही जे लढलो त्याचं कौतुक सुद्धा त्यांनी केलं पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
देवाची इच्छा असेल तर महापौर आमचा होईल
देवाची इच्छा असेल तर महापौर आमचा होईल, मेवाची नाही, थोडा फार फरक आहे असं सूचक वक्तव्य देखील उद्धव ठाकरे यांनी केलं. हॉटेलमध्ये ठेवलेले नगरसेवक जे निवडून आलेले त्यात आमचे किती आहेत? त्यांना विचारा का हॉटेल मध्ये ठेवलं. फोडणाऱ्यांना आपले लोक फुटण्याची भीती आहे असा टोला देखील ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला. त्यांचा विजय डागाललेला आहे. ज्यांची मदत घेऊन महापौर बसवत आहे त्यांना लाज वाटली पाहिजे. गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे आपण काय करतोय अशी टीका देखील ठाकरेंनी केली.
आत्ता त्यांचा पक्ष फोडून महापौर बसवणार का? ठाकरेंचा शिंदेंना टोला
आम्ही कमजोर नाही. आम्ही रस्त्यावर आहोत असेही उद्धव ठाकरे म्हणाले. अडीच वर्ष अडीच वर्ष महापौर ते म्हणताय. आत्ता त्यांचा पक्ष फोडून महापौर बसवणार का? जसा आमचा पक्ष फोडला तसा पक्ष फोडतील. इंटरेस्टिंग आहे कीं महापौर कोणाचा होईल असे ठाकरे म्हणाले. मुंबई सोडून मी बाहेर जाऊ शकलो नाही त्यांची दिलगिरी व्यक्त मी केली आहे. पुन्हा सत्ता येईल जशी झाडांची पाने गळून पुन्हा नवी पालवी येते तशी नवी पालवी येईल आणि सत्ता येईल असे ठाकरे म्हणाले. मतदान झाल्यावर एक्सिट पोल जाहीर झाले. कसे झाले. मतदान सुरु होण्यापूर्वी निकाल लागत होते. बॅलेट पेपर पण नव्हते असे ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंसोबत जिल्हा परिषद निवडणूक लढावायला काय हरकत आहे?
शिवसेना भवन वॉर्ड आम्ही जिकूंन आणला. मनसे शिवसेना कोणाला कोणची मदत झाली असा नाही एक दिलाने आम्ही लढलो. राज ठाकरेंसोबत जिल्हा परिषद निवडणूक लढावायला काय हरकत आहे? एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी मी आधीच बोललो असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमचे 54 फोडले आमचे 65 निवडून आले. 21 ते 22 तारखेला सुनावणी आहे, पक्ष चिन्हाबाबत निर्णय होईल. पक्ष चिन्ह यांचं गेलं तर यांचं अस्तित्व काय राहणार? अशी टीका देखील उद्दव ठाकरेंनी शिंदे गटावर केली.





















