Uddhav Thackeray : लोकसभेला प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा म्हणाले, आता संजय राठोडला मांडीवर घेतील; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
Uddhav Thackeray , वाशिम : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय राठोड यांच्यावर टीका केली आहे.
Uddhav Thackeray , वाशिम : "मला भाजपचं आश्चर्य वाटत आहे. मोदी वाशिममध्ये प्रचाराला आले की नाही माहिती नाही. प्रचार सभेला येतील. सभेला आल्यानंतर संजय राठोडला मांडी घेतील. कर्नाटकात असाच एक माणूस आहे. प्रज्वल रेवण्णा असं त्याचं नाव आहे. हजारो महिलांची त्याने आयुष्य उद्ध्वस्त केली. मोदीजी तेव्हा लोकसभेला तिकडे गेले होते. त्यांनी तिथे जाऊन सांगितलं की, प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा. कशाला महिलांवर अत्याचार करायला?", असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. वाशिममध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
आरोप झाल्यानंतर चौकशी होईपर्यंत मी त्याला बाजूला बसवू शकत नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिक म्हटल्यानंतर एक वेगळेपण असतं. हिंमत, विश्वास, नितीमत्ता, चारित्र्य असतं. या सर्वांवरती याने बोळा फिरवला. गद्दारी फक्त उद्धव ठाकरेशी केली नाही तर शिवसेनेशी देखील केली आहे. तुमच्या बरोबर केली, बंजारा समाजाबरोबर केली. पुन्हा हे टिकोजीराव मत मागायला मोकळे आहेत. त्यांच्यावर जे आरोप झाले, त्यावेळी मला लाज वाटत होती. आरोप झाल्यानंतर चौकशी होईपर्यंत मी त्याला बाजूला बसवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारे आपण सगळे आहोत. एवढे घाणेरडे आरोप झाल्यानंतर चौकशी करायची नाही? जर पाप केलं नव्हतं, तर चौकशी होऊ दे. तेव्हा हे मिंधे माझ्यामागे लागले होते, आपला आपला आहे, म्हणत होते. मी म्हटलं तरी आपला असेल तरी त्याने गुन्हा केला असेल तर वाईट आहे. मी ते सहन करु शकणार नाही. मी त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं. त्यानंतर मिंधे कंपनीने सरकार पाडलं.
बैल पोळ्या दरम्यान 50 खोके एकदम ok लिहलेले फोटो पाहिले
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मशाल असेल तिथं पंजा आणि तुतारी बाकी चिन्ह नको. महाराष्ट्रात अंधार झाला म्हणून मशाल घेऊन आलो. वाशिमला बैल पोळ्या दरम्यान आलो होतो. बैल पोळ्या दरम्यान 50 खोके एकदम ok लिहलेले फोटो पाहिले. सोयाबीन कापसाला भाव नाही. गद्दार लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे. वाशिममध्ये मशाल पेटवावी लागेल. या आचारसंहितेमध्ये माझी बॅग तपासली. माझी बॅग तपासली त्याचा मला राग नाही.मिंधे आणि फडणवीस यांची बॅग तपासत नाहीत.
इतर महत्त्वाच्या बातम्या