एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : देशातील ठासून आणि घासून आलेले पहिले पाच उमेदवार

या निवडणुकीत काही उमेदवारांनी काही लाखांच्या मतांच्या अंतराने तर काहींना मात्र काही शे आणि हजाराच्याच मतांनी विजय मिळाला.

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. लोकसभेच्या एकूण 542 जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 350 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. जागांच्या आकड्यांच्या बाबतीत एकटा भारतीय जनता पक्षाने 303 च्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. स्वतः पंतप्रधान मोदी यावेळी देखील विक्रमी मतांनी वाराणसीमधून विजयी झाले. या निवडणुकीत काही उमेदवारांनी लाखांच्या मतांच्या अंतराने तर काहींना मात्र काही शे आणि हजाराच्याच मतांनी विजय मिळाला. देशातून सर्वात जास्त मतांच्या आघाडीवर टॉप पाच जे उमेदवार आहेत, ते भाजपचेच आहेत. देशातून सर्वाधिक मतांच्या अंतराने गुजरातमधील नवसारी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सी. आर. पाटील हे तब्बल 6,78,545 मतांनी विजयी झाले. कर्नाल हरियाणा येथून भाजपचेच संजय भाटीया 6, 54, 269 दुसऱ्या क्रमांकाची मतांची आघाडी घेत विजयी झाले. त्यानंतर राजस्थान भिलवाडा येथून सुभाषचंद्र बहेरीया हे 6, 37920 मतांनी तर हरियाणाच्या फरिदाबाद येथून कृष्णा पाल हे 6,36,032 मतांनी तर रंजनबेन भट्ट 5,87825 मतांनी विजयी झाले. तर सर्वात कमी मतांनी उत्तर प्रदेशातील मच्छलीशेर येथून बी. पी. सरोज उर्फ भोलेनाथ हे केवळ 181 मतांनी निवडून आले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्विपचे मोहम्मद फैजल हे 823 मतांनी निवडून आले. तर अंदमान निकोबारमधून काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा 1074 मतांनी निवडून आले. यानंतर बिहारच्या जहानाबाद येथून जेडीयूचे चंदेश्वर प्रसाद 1075 मतांनी निवडून आले. तर हरियाणाच्या रोहतकमधून भाजपचे अरविंदकुमार शर्मा हे 2636 मतांनी विजयी झाले. महाराष्ट्रातून जळगावमधून भाजपचे उन्मेष पाटील हे सर्वाधिक मतांच्या आघाडीने विजयी झाले तर औरंगाबादमधून एमआयएमचे इम्तियाज जलील हे सर्वत्र कमी इतक्या मतांनी विजयी झाले आहेत. देशात भाजपने 303 जागा जिंकल्या आहेत. तर एनडीएने 352 जागा जिंकल्या आहेत. एनडीएचा हा विजय 2014 पेक्षाही मोठा असल्यामुळे जगभरातून मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. दरम्यान जनतेने काँग्रेससह महाआघाडीला मोठा दणका दिला आहे. काँग्रेस पुरस्कृत संयुक्त पुरोगामी आघाडीला (युपीए) केवळ 87 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. तर अन्य पक्षांनी 103 जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या आहेत. त्यापैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीला 5, काँग्रेसला 1 आणि वंचित बहुजन आघाडीला 1 जागा जिंकता आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Embed widget