एक्स्प्लोर

Thane Lok Sabha Result 2024 : ठाण्यात शिंदेंचा डंका! नरेश म्हस्के विजयी; राजन विचारेंचा दारुण पराभव

Thane Lok Sabha Election Result 2024 : राज्यातील पाचव्या टप्प्यामध्ये 20 मे 2024 रोजी पार पडलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात (Thane Loksabha Election) एकूण 52.09 टक्के मतदान झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणेनगरीत शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटाचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन विचारे (Rajan Vichare) यांच्यात दुहेरी लढत पाहायला मिळाली.

Thane : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणेनगरीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन विचारे (Rajan Vichare) यांच्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान (Lok Sabha Election 2024) दुहेरी लढत पाहायला मिळाली. ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. नरेश म्हस्के या निवडणुकीत विजयी व्हावे याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मुख्यमंत्र्यांचा हुकमी एक्का म्हणून ओळख असलेले नरेश म्हस्के विजयी होणं हे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचं होतं. तर दुसरीकडे राजन विचारे निवडणुकीत विजयी होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करताना दिसून आले. बालेकिल्ल्यासाठी दोन्ही शिवसेनेत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. ठाण्यात नरेश म्हस्के विजयी झाले असून राजन विचारे यांचा पराभव झाला आहे. नरेश म्हस्के  6,54,895 मतांनी विजयी झाले आहेत. तर राजन विचारे यांना 4,69,298 मते मिळाली.

ठाणे लोकसभा निकाल (Thane Lok Sabha Election Result 2024)

उमेदवाराचे नाव पक्ष विजयी उमेदवार
नरेश म्हस्के शिवसेना शिंदे गट विजयी
राजन विचारे शिवसेना ठाकरे गट पराभव

ठाण्यात किती टक्के मतदान?

ठाण्यात मतदारांमध्ये निरुत्साह होता. त्यामुळे मतटक्क्यात घट दिसून आली. 50 टक्क्यांपर्यंत पोहोचतानाच दमछाक होती. मतदारांकडून नाराजी व्यक्त केली. ठाण्यातील नागरिकांमध्ये मतदानाबद्दलची कमालीची नाराजी दिसली. ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान झालं. पुरुष मतदारांचे प्रमाण 53.22 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 50.79 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 17.39 टक्के आहे.

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? (Thane Lok Sabha Voting Percentage 2024)

  • एकूण मतदान - 52.09 टक्के
  • मिरा भाईंदर - 48.95%
  • ओवळा माजिवडा - 50.72%
  • कोपरी पाचपाखाडी - 56.25%
  • ठाणे - 59.52%
  • ऐरोली - 48.47%
  • बेलापूर - 51.53%

कोणत्या मतदारसंघात कोण आमदार? 

  • मिरा भाईंदर - गीता जैन (अपक्ष)
  • ओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक (शिवसेना शिंदे गट)
  • कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे (शिवसेना)
  • ठाणे - संजय केळकर (भाजप)
  • ऐरोली - गणेश नाईक (भाजप)
  • बेलापूर - मंदा म्हात्रे (भाजप)
  • महायुतीचे विजयी उमेदवार नरेश म्हस्के यांना मिळालेली एकूण मतं - 7,34,231

  • महाविकास आघाडीचे उमेदवर राजन विचारे यांना मिळालेली एकूण मतं - 5,17,220

  • नरेश म्हस्के यांना मिळालेला लीड - 2,17,011

विधानसभा मतदारसंघ निहाय मतांची आकडेवारी

ठाणे शहर विधानसभा (भाजप आमदार संजय केळकर)
(म्हस्के यांना 47985 मताधिक्य)
- नरेश म्हस्के - 126321
- राजन विचारे - 78336

मीरा-भाईंदर विधानसभा (अपक्ष आमदार गीता जैन)
(म्हस्के यांना 39027 मताधिक्य)
- नरेश म्हस्के - 126000
- राजन विचारे - 76973

ओवळा - माजिवडा विधानसभा (शिंदेंची शिवसेना,आमदार प्रताप सरनाईक)
(म्हस्के यांना 62429 मताधिक्य)
- नरेश म्हस्के - 154838
- राजन विचारे - 92399

कोपरी - पाचखाडी विधानसभा (आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
(नरेश म्हस्के यांना 44338 मताधिक्य)
- नरेश म्हस्के - 110991
- राजन विचारे - 66653

बेलापूर विधानसभा (भाजप आमदार मंदा म्हात्रे)
(नरेश म्हस्के यांना 12312)
- नरेश म्हस्के - 102312
- राजन विचारे - 90000

ऐरोली विधानसभा (भाजप आमदार गणेश नाईक)
(म्हस्के यांना 9735)
- नरेश म्हस्के - 109485
- राजन विचारे - 99750

2019 सालचा निवडणूक निकाल - (Thane Lok Sabha Constituency 2019 Result)

- राजन विचारे (शिवसेना) 7,40,969 (63.3%)

- आनंद परांजपे (राष्ट्रवादी) 3,28,824 (28.09%)

- मल्लिकार्जुन पुजारी (वंचित बहुजन आघाडी) 47,432 (4.05%)

ठाण्यात सेना विरुद्ध सेना

शिवसेनेची सर्वाधिक शक्ती असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक अत्यंत रंजक झाली. ठाण्यात सेना विरुद्ध सेना अशी लढत पाहायला मिळाली. सन 2014 आणि 2019 या दोनवेळा लोकसभेत मैदान मारणाऱ्या राजन विचारे यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हुकमी एक्का असलेले नरेश म्हस्के होते. 

बालेकिल्ला आपल्याकडे ठेवण्यात मुख्यमंत्र्यांना यश

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासूनच ठाणे लोकसभेसाठी अनेक नावांची चर्चा होती. प्रताप सरनाईक, मिनाक्षी शिंदे अशी अनेक नावे समोर आली. भाजपकडून देखील संजय केळकरांचे नाव चर्चेत होते. या जागेसाठी  एकनाथ शिंदेंनी अनेक बैठका घेतल्या. अखेर ठाण्याचा बालेकिल्ला आपल्याकडे ठेवण्यात एकनाथ शिंदेंना यश मिळाले. भाजपचा आग्रह मोडत एकनाथ शिंदेंनी ही  जागा आपल्याकडे ठेवली. 

शिवसैनिक कोणाच्या बाजूने?

शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर राजन विचारे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहिले. तर दुसरीकडे ठाण्यातील अनेक नेते आणि महापालिकेतील नगरसेवक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला. पण या सगळ्यात सामान्य शिवसैनिक कोणाच्या बाजूने आहेत हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. ठाण्यातील यंदाची निवडणूक प्रचंड चुरशीची झाली.

संबंधित बातम्या

Thane Lok Sabha constituency : ठाणे लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार, राजन विचारेंसमोर आव्हान कुणाचं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :18 डिसेंबर 2024 : ABP MajhaOne Nation One Election : एक देश एक निवडणूक घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
Embed widget