एक्स्प्लोर

Tasgaon Vidhan Sabha constituency : रोहित पाटलांचा राजकारणाचा श्रीगणेशा! तासगावमधून विजय, भाजपचे संजयकाका पाटील पराभूत

Tasgaon Kavathe Mahankal Assembly Constituency : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहित पाटील यांच्यासमोर भाजपमधून अजित पवार गटात गेलेल्या संजयकाका पाटील यांचे आव्हान होतं. 

सांगली : राज्याचं लक्ष लागून असलेल्या तासगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहित पाटील यांनी बाजी मारली. तासगाव कवठे महांकाळमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहित पाटलांनी 26,577 मतांनी विजय मिळवला आहे. रोहित पाटील यांना 1,26,478 मतं मिळाली तर भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना 99,901 मतं मिळाली. 

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी शरद पवार गटाकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात अजित पवारांनी भाजपच्या संजयकाका पाटील यांना पक्षात घेऊन तिकिट दिलं.  रोहित पाटील यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा करणारी आणि लोकसभेत पराभूत झालेल्या भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या राजकारणाची अस्तित्वाची ही लढाई होती. त्यामध्ये रोहित पाटलांनी बाजी मारली.

शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केली

आर आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या दोन वेळा आमदार राहिल्या. त्यांच्या मुलाने म्हणजे रोहित पाटलांनी वयाची पंचविशी पूर्ण केल्यानंतर आमदारकीची तयारी सुरू केली. स्वतः शरद पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना पाठबळ कसे मिळेल यासाठी लक्ष घातलं. तर दुसरीकडे कवठेमहांकाळचे नेते अजितराव घोरपडे यांनी संजयकाकाना पाठिंबा दिला होता. 

सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आर आर पाटलांनी झेडपी ते आमदार आणि नंतर मंत्री अशी झेप घेतली. त्यांचाच वारसा आता रोहित पाटील चालवत असून त्यांचीही नाळ सर्वसामान्यांसोबत जुळल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे आर आर पाटील यांचे पारंपरिक विरोधक संजयकाका पाटील हे दोन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांच्यामागे भाजपची ताकद, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद उभी होती. 

तासगावातील महत्त्वाचे प्रश्न

दुष्काळी समजल्या जाणाऱ्या तासगाव मतदारसंघामध्ये म्हैशाळ टेंभू पाणी योजना ही महत्त्वाची योजना आहे. आता त्यावरून श्रेयवाद सुरू असल्याचं दिसून येतंय. तर द्राक्षे उत्पादक शेतकरी आणि त्यांचे प्रश्नही या मतदारसंघामध्ये महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. 

सांगलीतील इतर भागांची तुलना करता विकासाच्या बाबतीत तासगाव काहीसा मागे पडल्याचं दिसतंय. या ठिकाणी मोठ्या उद्योगांचा अभाव आहे. कागदोपत्री तासगावमध्ये एमआयडीसी मंजूर झाली आहे. रोहित पाटलांच्या प्रयत्नामुळे एमआयडीसी तर मंजूर झाली. पण त्यासाठी निधीच दिला नसल्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. 

ही बातमी वाचा : 

    

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election 2026: 'माघार घेण्यासाठी फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना नाही'; नाशिकमधील भाजप बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने खळबळ
'माघार घेण्यासाठी फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना नाही'; नाशिकमधील भाजप बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने खळबळ
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Sunetra Pawar and Navneet Rana: राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग
राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग
Jaykumar Gore on Supriya Sule: पुण्यात कितीचा घोडेबाजार झाला? सुप्रिया सुळेंच्या आरोपावर जयकुमार गोरेंचा जोरदार पलटवार; म्हणाले...
पुण्यात कितीचा घोडेबाजार झाला? सुप्रिया सुळेंच्या आरोपावर जयकुमार गोरेंचा जोरदार पलटवार; म्हणाले...

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
India vs Afghanistan: अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
गुलाबी आँखे जो तेरी देखी..; नागपुरात मुख्यमंत्र्यांनी गायले दोन गाणे; दुसरं गाणं धर्मेंद्रचं सुपरहीट, टाळ्या वाजवून दाद
गुलाबी आँखे जो तेरी देखी..; नागपुरात मुख्यमंत्र्यांनी गायले दोन गाणे; दुसरं गाणं धर्मेंद्रचं सुपरहीट, टाळ्या वाजवून दाद
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अभिजितचा पलटवार
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या 'अराजकतावादी' टीकेवर अभिजितचा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
Embed widget