एक्स्प्लोर

Tamil Nadu Exit Poll : एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयची TVK पार्टी 120 जागा जिंकण्याची शक्यता, द्रमुकला धक्का?

Tamil Nadu Exit Poll : तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजयची पार्टी TVK मोठं यश मिळवण्याची शक्यता आहे, असा अंदाज एक्सिस माय इंडियानं व्यक्त केला आहे.

Tamil Nadu Exit Poll चेन्नई : पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर विविध संस्थांकडून एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज बहुतांश संस्थांकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र, तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता एका संस्थेच्या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आली आहे. पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या अभिनेता विजय याच्या तमिलगा वेत्री कझगम या पक्षाला मोठं यश मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार अभिनेता विजयचा टीव्हीके पक्ष 120 जागांवर विजय मिळवू शकतो. दुसऱ्या स्थानी द्रमुक आणि तिसऱ्या स्थानी अण्णाद्रमुक राहू शकते.  

एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार टीव्हीके पक्षाला यावेळी 98 ते 120 जागांवर विजय मिळेल. तर, द्रुकला 92-110 जागांवर विजय मिळू शकतो. अण्णाद्रमुक पक्षाला 22-32 जागा मिळू शकतात. तामिळनाडूत सध्या द्रमुकचं सरकार असून काँग्रेसची त्यांच्यासोबत आघाडी आहे. तर, भाजप अण्णाद्रमुकचा मित्रपक्ष आहे. एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरलं तर अभिनेता विजय राजकारणात मोठा चमत्कार करण्यात यशस्वी ठरेल. विजय यानं दोन वर्षांपूर्वी पक्ष स्थापन केला होता आणि त्याच्या पक्षानं पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आहे. विजयच्या प्रचाराच्या सभांना मोठी गर्दी होत होती.

बहुतांश संस्थांचा अंदाज, द्रमुक पुन्हा सत्तेत

एक्सिस माय इंडियानं अभिनेता विजयचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज वर्तवला असला तरी इतर संस्थांनी तामिळनाडूत द्रमुकची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला आहे. मॅटराइज एक्झिट पोलनं द्रमुक आघाडीला 122-132 जागा, अण्णाद्रमुक आणि मित्रपत्रांना 87-100  जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे. पी मार्कनं द्रमुक आघाडीला 125-145 जागा, अण्णाद्रमुक आघाडीला 65-85 जागा आणि टीव्हीकेला 16-26 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

पीपल्स इन्साईटनुसार TVK ला 30-40 जागा

पीपल्स पल्स नुसार तामिळनाडूत द्रमुकची पुन्हा सत्ता येऊ शकते. द्रमुक आघाडीला 125-145 जागांवर विजय मिळू शकतो. अण्णा द्रमुक आघाडीला 65-80 जागांवर विजय मिळू शकतो. तर टीव्हीकेला 18-24 जागांवर विजय मिळू शकतो.  प्रजा पोल्सनुसार द्रमुक आघाडीला 148-168 जागांवर विजय मिळेल. तर,  अण्णाद्रमुकला 61-81 जागा मिळू शकतात. अभिनेता विजयच्या पक्षाला 9 जागांवर विजय मिळू शकतो.  पीपल्स इनसाईनुसार अभिनेता विजयचा पक्ष 30 ते 40 जागा जिंकू शकतो. तर, द्रमुकला 120 ते 140 जागांवर विजय मिळू शकतो. तर, अण्णाद्रमुकला 60-70 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget