Supriya Sule : मी अजित भाऊ हा उल्लेख टाळतेय, कारण...; भर सभेत सुप्रिया सुळेंचा अजित दादांना चिमटा
अजित गव्हाणे हे आमदारकीचे सर्टिफिकेट घेतील यात शंका नाही. मी अजित भाऊ म्हणतेय पण ते म्हणताना मी अजित दामोदर गव्हाणे असा उल्लेख करायला हवा. असे म्हणत भर सभेत सुप्रिया सुळेंनी अजित दादांना चिमटा काढलाय
Supriya Sule on Ajit Pawar : अजित दामोदर गव्हाणे हेच आमदारकीचे सर्टिफिकेट घेतील यात शंका नाही. आता मी अजित भाऊ म्हणतेय पण ते म्हणताना मी अजित दामोदर गव्हाणे असा उल्लेख करायला हवा. अन्यथा काहीजण माझं भाषण ईडीट करून वापरू शकतात. म्हणून मी फक्त अजित भाऊ आमदार होतील असं म्हणाले नाही, तर आम्हाला आमचा अजित दामोदर गव्हाणे हाच आमदार हवाय, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पक्षाच्या समर्थकांना उद्देशून भर सभेत सुप्रिया सुळेंनी टोला लागवला आहे.
सुप्रिया सुळे (Supriya Sule) भोसरीतील शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार अजित गव्हाणेंचा प्रचार करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळेंचे भाषण झाले. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यावर भाष्य करत सरकारवर टीका केली.
लोकसभेपर्यंत लाडक्या बहिणीबाबत काय-काय केलं?
लोकसभेपर्यंत बहीण लाडकी नव्हतीचं, हे माझ्याशिवाय कोणीच सांगू शकत नाही. कारण सगळं तर माझ्या विरोधातचं लढाई सुरू होती. या बहिणीबाबत कोणी काय-काय केलं हे सर्वांनी पाहिलं आहेच. त्यामुळं आता लाडकी बहीण आठवलेली आहे. असा टोला ही सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला आहे.
लाडक्या बहिणींचे पैसे परत तर घेऊन दाखव, सुप्रिया सुळेंचा सज्जड दम
आमच्या बहिणींना ज्या सभेला जायचं, त्या सभेला जाऊ शकतात आणि त्या जातीलच. त्यांचे फोटो काढून तुम्ही जर लाडक्या बहिणीचे पैसे काढून घेण्याची भाषा करताय. अरे तू पैसे परत घेऊन तर दाखव, काय हिंमत आहे तुझी. त्या दिल्लीच्या ताकदीवर बोलता का? अरे तू हुजरेगिरी करतो आणि इथं दमबाजी करतो का? तू लाडक्या बहिणीचे पैसे तर घेऊन दाखव. मग बघते. असे म्हणत भाजपचे खासदार धनंजय महाडीक यांना सुप्रिया सुळेंनी सज्जड दम दिलाय.
भुजबळ साहेबांनी पुस्तकात म्हटलंय, की भाजपसोबत गेल्यापासून सगळे शांत झोपत आहेत. आता झोप का गेली आणि झोप का आली? हे भुजबळ साहेब आणि त्या राष्ट्रवादीतील सगळे सांगू शकतील. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या
हे ही वाचा