एक्स्प्लोर

मविआच्या अधिकृत उमेदवाराच्या एवजी काँग्रेसचे दिग्गज नेते निलंबित बंडखोर उमेदवाराच्या प्रचारात; रामटेक मतदारसंघात मविआत बिघाडी?

Ramtek Constituency : काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार आणि रामटेकचे खासदार श्याम बर्वे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ऐवजी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारासाठी मत मागताना दिसत आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Election 2024) काँग्रेसनं बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली आहे. बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसने आतापर्यंत एकूण 28 काँग्रेस बंडखोरांची हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या सूचनेवरून पक्षानं बंडखोरांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक (Rajendra Mulak), काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार (Yajnavalkya Jichkar), पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल (Aaba Bagul) आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे (Kamal Vyavhare) यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. 

दरम्यान, असे असले तरी काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार (Sunil Kedar) आणि रामटेकचे खासदार श्याम बर्वे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ऐवजी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारासाठी मत मागताना दिसत आहेत. त्यामुळे मविआत आधीच रामटेकच्या जागेवरून घमासान झाले असताना रामटेक मतदारसंघात माविआत बिघाडी झालीय का? असा सवाल या निमित्याने विचारला जाऊ लागला आहे.

रामटेक मतदारसंघात माविआत बिघाडी?

रामटेक विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि  महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारा विरोधात बंडखोरी केल्यामुळे काँग्रेसने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांची पक्षातून हकालपट्टी केली खरी, मात्र तरीही काँग्रेसचे नेते पूर्ण शक्तीने बंडखोर उमेदवाराचा प्रचार करत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मत मागत असल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या विरोधात?

आज सकाळी रामटेक विधानसभा मतदारसंघातील चाचेर गावात बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांची प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार, रामटेक मतदारसंघाचे खासदार श्याम बर्वे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे हे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यासाठी मत मागताना दिसले. त्यामुळे रामटेक मतदारसंघात काँग्रेस पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात झाली आहे का? असे चित्र या प्रचार सभेमुळे दिसून येत आहे.

हे ही वाचा 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सत्तेची चावी महायुती की महाविकास आघाडीकडे? पवार काका पुतण्या अन् शिंदे ठाकरेंमध्ये 'या' 158 मतदारसंघात थेट लढत!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
BJP : भाजपचं खेड्याकडे चला, सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करा, भाजपच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
Embed widget