एक्स्प्लोर

बंदुकीचा धाक, पैशाचा वापर ते निववडणूक आयोगाचं दुर्लक्ष, संसदेत आवाज उठवणार, बिनविरोध निवडणुकांवरुन सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपसह, शिंदे गट आणि मागून अजित पवार गटाचे काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.

Supriya Sule : महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपसह, शिंदे गट आणि मागून अजित पवार गटाची बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी स्पर्धाच लागली आहे. मात्र ही स्पर्धा अघोरी पद्धतीचा असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे काही घडत आहे, ते माझ्यासह राज्यातील जनतेच्या मनाला अस्वस्थ करणारे असल्याचे सुळे म्हणाल्या. NOTA चा पर्याय उपलब्ध असूनही मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे असल्याचे सुळे म्हणाल्या.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

तब्बल 7 ते 8 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडणुका होत आहेत. NOTA चा पर्याय उपलब्ध असूनही मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यामध्ये धमकीचे प्रकार, बंदुकीच्या जोरावर दहशत, पैशांचा अतोनात वापर, उमेदवारी अर्ज माघारीसाठी विविध प्रकारचा दबाव, ब्लॅकमेलिंग, बोगस मतदान आणि मतदारांना दिली जाणारी प्रलोभने असे अनेक गंभीर प्रकार माध्यमांतून सातत्याने समोर येत असल्याचे सुळे म्हणाल्या. हे सर्व घडत असताना निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष अधिकच चिंताजनक आहे. सुदृढ लोकशाहीसाठी हे अतिशय धोकादायक आहे. मी याबाबत यापूर्वीही संसदेत आवाज उठवला आहे, आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी पुढेही हे मुद्दे सातत्याने मांडत राहावे लागणार आहेत असे सुळे म्हणाल्या. 

भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे महाराष्ट्रातील 69 पैकी 68 जागांवर उमेदवार बिनविरोध 

मनपा निवडणुकीमध्ये चांदा ते बांदा भाजप, शिंदे गट आणि मागून अजित पवार गटाची बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी स्पर्धाच लागली. मात्र ही स्पर्धा अघोरी पद्धतीचा असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. इतकेच नव्हे तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा धमकी देणारा व्हिडिओ सुद्धा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियामध्ये व्हायरल केला. यामध्ये ते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना थेट सुरक्षा काढून टाकण्यासाठी धमकी देत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडूनही उमेदवारांना धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार महाराष्ट्रातील 69 पैकी 68 जागांवरती बिनविरोध निवडून आले आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे. आपली निवडणूक व्यवस्था संकटामध्ये सापडत झाली आहे. पैशाची ताकद आणि राजकीय दबाव यावरच आता निवडणूक निकाल ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

प्रतिस्पर्धी उमेदवाराला आर्थिक अमिष,  कोट्यावधी रुपयांचा चुराडा, महापालिका निवडणुकांना किळसवाणे स्वरुप, राजू शेट्टींची हल्लाबोल 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget